जुन्या तव्यावर, कडेला जमा झालेला काळा थर तुम्ही अनेकदा पहिला असेल. तो स्वच्छ करण्यासाठी भरपूर प्रयत्नदेखील केले असतील. मात्र तो थर काही केल्या जात नाही. तुमच्याही घरी असा तवा आहे का? त्यावरचे कोटिंग न घालवता तो स्वच्छ कसा करायचा, असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का? मग इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील nanikapitara_ नावाच्या अकाउंटने त्यासाठी एक भन्नाट अशी ट्रिक एका व्हिडीओ मधून शेअर केली आहे.

दररोज पोळ्या, चपात्या बनवण्यासाठी आपण तव्याचा वापर करत असतो. तसेच कधीतरी त्याच तव्यावर डोसा, घावन, थालीपीठ, अंड्याचे ऑमलेट यांसारखे कितीतरी वेगवेगळे पदार्थ शिजवले जातात. हे पदार्थ बनवत असताना, तव्यावर तेल, तूप, बटर वैगरे गोष्टी घातल्या जातात. या पदार्थांचे तव्यावर राहिलेले अंश जर नीट घासले गेले नाही किंवा नीट स्वच्छ झाले नाही तर मात्र तव्याला वास येतो. तवा तसाच ओशट राहतो. मात्र तव्यावरच्या ओशटपणासह, त्यावर जमलेला काळा थर अगदी दहा मिनिटांमध्ये अगदी नाहीसा करण्यासाठी काय उपाय आहे पाहा आणि प्रयोग करून पाहा.

हेही वाचा : Kitchen tips : मातीची भांडी वापरल्यावर कशी धुवावी? काय करावे, काय नको पाहा

तव्यावरची काळा थर काढण्यासाठी ट्रिक

साहित्य

व्हिनेगर
खायचा सोडा/इनो
कापड

कृती

  • सर्वप्रथम स्वच्छ करायचा तवा, गॅसवर ठेऊन मध्यम आचेवर तापवून घ्या.
  • आता तवा तापल्यानंतर त्यावर साधारण एक चमचा व्हिनेगर घालून घ्या.
  • तव्यावर व्हिनेगर घातल्यानंतर, त्यामध्ये खायचा सोडा किंवा इनो मिसळून मिश्रण सर्व तव्यावर पसरवून घ्या.
  • आता हे मिश्रण तव्यावर किमान दहा ते पंधरा मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे.
  • तवा थंड झाल्यावर ओल्या कापडाच्या एका तुकड्याने तव्यावरील सर्व मिश्रण पुसून घ्यावे.
  • आता हीच क्रिया पुन्हा, दोन ते तीनवेळा करावी.
  • तुमच्या तव्यावरची सर्व काळ थर निघून जाईल आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तव्यासारखा स्वच्छ होण्यास मदत होईल.

हेही वाचा : Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स

हा भन्नाट जुगाड इन्स्टाग्रामवरील @nanikapitara_ नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १.२ मिलियन इतके व्ह्यूजदेखील मिळाले आहेत.