Constipation treatment at home: बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे, जाचा त्रास मुलं, तरुण, मोठे आणि वृद्ध, अशा सर्व वयोगटांतील लोकांना कधी ना कधी होतो. त्याची कारणे अनेक असू शकतात, जसे की असंतुलित आहार, वाईट जीवनशैली, काही औषधांचा नियमित वापर, पुरेसे पाणी न पिणे वा सतत ताणतणावात राहणे.
बद्धकोष्ठता किती गंभीर आहे हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. काही लोकांना हा त्रास फक्त काही दिवसांपुरता होतो, तर काही लोकांना वारंवार होतो. काही वेळा बद्धकोष्ठता इतके गंभीर स्वरूप धारण करते की, आठवड्यात तीन-चार दिवस मल बाहेर पडत नाही. अशा स्थितीत पोटात गॅस, पचनसंस्थेतील बिघाड पित्त आणि पोटात जडपणासारख्या समस्या वाढतात.
पोटात जमा झालेला मल कालांतराने सडू लागतो आणि मग तो आतड्यांमध्ये जमा होत होऊन सूज, इन्फेक्शन आणि बद्धकोष्ठतेशी संबंधित इतर समस्या निर्माण करू शकतो. खूप दिवस बद्धकोष्ठतेचा त्रास तसाच राहिला की, पचन कमी होते आणि शरीराला आवश्यक व्हिटॅमिन व मिनरल्स मिळण्यात अडथळा येतो. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे, रोज हलका व्यायाम करणे आणि आयुर्वेदिक घरगुती उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय ताण कमी करणे आणि शौचाला जाण्याची नियमित वेळ पाळणे यानेही पोट स्वच्छ आणि व्यवस्थित राहते.
आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सुभाष गोयल म्हणाले की, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर तुमच्या आहारात सुधारणा करा. जास्त पाणी प्या आणि काही हर्बल पदार्थांचा उपयोग करा. त्रिफळा चूर्ण बद्धकोष्ठतेवर उपयुक्त आहे. डॉक्टरांनी सांगितले की, जर तीन-चार दिवस मल निघत नसेल, तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा ज्येष्ठमध गरम पाण्यासोबत घ्या. ज्येष्ठमध बद्धकोष्ठता कमी करते आणि पचन क्रिया ठीक करते. चला तर मग पाहूया की, ज्येष्ठमध आणि त्रिफळा बद्धकोष्ठतेवर कसे फायदेशीर ठरतात ते…
ज्येष्ठमध (Licorice) बद्धकोष्ठतेवर कशी फायदेशीर? (How to clean stomach)
ज्येष्ठमध चवीला गोड आणि ताजेतवानि असते. ही औषधी वनस्पती आरोग्यासाठी उपयोगी मानली जाते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, ज्येष्ठमध घेतल्याने पचनसंस्था व्यवस्थित राहते. आयुर्वेदात ज्येष्ठमधाला वात आणि पित्त दोष संतुलित करणारे मानले गेले आहे. ज्येष्ठमध आतड्यांच्या परतिला मऊ करते आणि मलाला मऊ बनवते. ज्यांना दीर्घकाळ बद्धकोष्ठता असते, त्यांनी ज्येष्ठमधाचे सेवन करावे. ही औषधी पोटाची सूज नियंत्रित करते, गॅस, पित्त आणि अपचन कमी करते. त्यामुळे पचन सुधारते आणि आतड्यांचे कामकाजही सुरळीत चालू राहते.
त्रिफळा चूर्ण घ्या
त्रिफळा म्हणजे हरडा, बेहडा व आवळा या तीन फळांचं मिश्रण , जे बद्धकोष्ठता आणि अपचनावर खूप उपयुक्त आहे. त्रिफळा चूर्ण घेतल्याने आतड्यांची साफसफाई होते आणि मल मऊ होतो. हे चूर्ण आतड्यांमध्ये जमा झालेल्या विषाक्त पदार्थांना बाहेर काढते आणि पचनसंस्थेला सक्षम करते. या चूर्णाचे योग्य असे सेवन केल्याने शौच प्रक्रिया सुरळीत होते. आणि पोट स्वच्छ राहते. त्रिफळामध्ये हलके लॅक्सेटिव्ह गुण असतात, जे पोट जड राहणे आणि बद्धकोष्ठता यांपासून आराम मिळवून देतात. त्रिफळा घेतल्याने दीर्घकाळची बद्धकोष्ठताही सुधारू शकते.