How to Cut an Onion : भारतीय जेवणामध्ये कांद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाजी असो की नाश्ता, सॅलड किंवा कोणतीही रेसिपी, कांदा हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो.
कांदा कापताना डोळ्यातून पाणी सुद्धा येते.काही लोकांना डोळ्यांत जळजळ सुद्धा होते.अनेक लोक याच कारणामुळे कांदा कापायला सुद्धा टाळतात.
तुम्हाला कांदा कापण्याची सोपी आणि स्मार्ट पद्धत माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कांदा कापण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला एक कांदा घ्या आणि कांदा मुळापासून वरच्या दिशेने मधोमध कापून दोन तुकडे करा.दोनपैकी एका कांद्याचा तुकडा घ्या आणि कांद्याचा शेवटचा भाग कापा. त्यानंतर कांद्या उभा बारीक चिरुन घ्या. त्यानंतर कांदा आडवा बारीक चिरा. संपूर्ण पद्धत नीट समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अगदी काही क्षणात बारीक कांदा चिरू शकता. कांदा कापण्याचा हा सोपी जुगाड तुम्हाला आवडू शकतो.
हेही वाचा : डाएट करताना मॅगी खावी का? वाचा, न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात…
natashaskitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कांदा कापण्याचा अतिशय स्मार्ट पद्धत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे.एका युजरने लिहिलेय, “मी असा कधीच कांदा कापला नाही पण खरंच ही खूप चांगली टिप आहे”