मुंग्यांना गोड पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे एखादा गोड पदार्थ मिनिटभर देखील उघडा ठेवला तर मुंग्यांची अख्खी फौज जमा होते. अशा परिस्थितीत साखरेचे मुंग्यांपासून संरक्षण करणे अवघड होते. कारण मुंग्या उघड्यावरच नाही तर बंद डब्यातही प्रवेश करतात. त्यामुळे अनेकवेळा साखरेचा डब्या मुंग्यांनी भरतो. त्यामुळे अशी साखर वापरताना खूप अडचणी येतात, असे तुमच्यासोबतही अनेकदा घडले असेल.
अशावेळी अनेकजण मुंग्यांनी भरलेली साखर फेकून देतात. किंवा खूप साखर असलेल तर काही ना काही युक्ती करुन साखरेपासून मुंग्या वेगळ्या करतात. आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने मुंग्यांना साखरेच्या डब्ब्यापासून दूर ठेऊ शकता.
१) साखर अशाप्रकारे करा स्टोर
जर साखर व्यवस्थित डब्ब्यात ठेवली तर मुंग्या कधीही त्यात जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. यासाठी साखरेचा डब्बा हवा जाणार नाही असा घट्ट असावा. तसेच साखरेच्या मध्ये लवंग, वेलची, तमालपत्र यांसारखे गरम मसाल्यांचे तुकडे ठेवा. त्यामुळे मुंग्या साखरेभोवती फिरकणार नाहीत.
२) साखरेत मुंग्या गेल्या तर करा हे काम
साखरेच्या डब्यात मुंग्या भरल्या असतील तर त्या काढण्यासाठी कोमट पाणी वापरु शकता. यासाठी डब्ब्यातील साखर एका एका प्लेटमध्ये काढा. नंतर ही प्लेट गरम पाण्याच्या मध्यभागी ठेवा. असे केल्याने उष्णतेमुळे सर्व मुंग्या साखर सोडून पळून जातील.
३) साखरेतील मुंग्या काढण्यासाठी हा उपाय ठरेल प्रभाव
तुमच्या साखरेच्या डब्ब्यात खूप मुंग्या लागल्या असतील तर दुकानातून भीमसेन कपूर विकत घ्या आणि त्यात ठेवा. पण यावेळी डब्ब्याचे झाकण बंद करू नका, अन्यथा मुंग्या आतच मरतील, नंतर त्या काढणे आपल्यासाठी खूप कठीण होईल.
४) साखरेतील मुंग्या काढण्यासाठी चुकूनही करु नका हा उपाय
साखरेतील मुंग्या काढण्यासाठी ती उन्हात ठेवल्याचा उपाय अत्यंत चुकीचा आहे. असे केल्याने साखरेचा ताजेपणा निघून जातो. यासोबतच त्याची चवही काही वेळातच खराब होऊ लागते आणि त्यात चिकटपणा येतो.