thick eyelashes: आपला चेहरा हिच आपली खरी ओळख असते असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. चेहऱ्याच्या सौंदर्यामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये भर पडते. त्यातल्या त्यात चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये डोळ्यांची फार मोठी भूमिका असतेसौंदर्याचा विशेष संबंध डोळ्यांशी आणि डोळ्यांच्या पापण्यांशी असतो. जाड/दाट पापण्या लोकांचे लक्ष वेधून घेतात. आपलं सौंदर्य जपण्यासाठी नेहमीच महिलांचे निरनिराळे प्रयत्न सुरू असतात. त्यातल्या त्यात डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यात डोळ्यांच्या पापण्यांचं मोठे योगदान असते. आपल्या पापण्या लांबसडक आणि घनदाट असाव्यात असे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते परंतु जर तुमच्या पापण्या दाट नसतील तर, त्यासाठी महागड्या ट्रिटमेंट घेण्याऐवजी काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या पापण्या दाट बनवू शकता…

मेकअप नेहमी स्वच्छ करा

तुमच्या डोळ्यावरील मेकअप तसाच ठेऊन कधीही झोपू नका, नेहमी मेकअप रिमूव्ह करूनच झोपा. डोळ्यातील घाण वारंवार स्वच्छ करा. नेहमी पाण्याने हळूवार तुमचा डोळ्यांचा मेकअप काढा.

पापण्यांवर सारखा मेकअप करु नका

मस्कराचे जाड आवरण आणि हेवी लॅश एक्स्टेंशन पापण्यांवरील केसांच्या मुळावर दाब देतात. तुमच्या पापण्यांना टवटवीत ठेवण्यासाठी डोळ्यांवर मेकअप करणे टाळा.

सकस आहार घ्या

तुमच्या आहारात बदल केल्याने तुमच्या पापण्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो, त्यामुळे सकस आहार घ्या. मासे, पालेभाज्या या पदार्थांचा समावेश जेवनात करा.

पोषण

केसांची वाढ करण्यासाठी, शरीरातील पोषण राखणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने युक्त आहारामुळे केसांची वाढ तर वाढतेच पण केस गळणेही कमी होते.

मसाज करणंही फायदेशीर

डोळ्यांच्या आयलिड्समुळेच पापण्यांच्या केसांची वाढ होते. येथील ब्लड फ्लो जर सुरळीत असेल तर पापण्यांची वाढ होण्यास मदत होईल. दोन्ही डोळ्यांना आय लिडवर मसाज केल्याने रक्त प्रवाह वाढविण्यास मदत होईल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं केल्यानं फायदा होईल.

पापण्या लांब, दाट करण्याचे घरघुती उपाय

खोबरेल तेल

केसांची निगा राखण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर बराच काळ केला जात आहे. खोबरेल तेलामध्ये आढळणारे लॉरिक ऍसिड केसांची वाढ सुधारते. नारळाच्या तेलाने पापण्यांचे पोषण करण्यासाठी, रात्रीच्या वेळी कापसाच्या मदतीने केसांना लावा आणि सकाळी चेहरा धुवा आणि स्वच्छ करा.

ऑलिव्ह ऑईलही फायदेशीर

ऑलिव्ह ऑईलमध्ये फेनोलिक कंपाऊंड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पापण्या लांब व घनदाट होतात. झोपण्यापूर्वी पापण्यांना नियमितपणे ऑलिव्ह ऑईल लावावे.

एरंडेल तेल

केस दाट आणि लांब करण्यासाठी एरंडेल तेल हा उत्तम पर्याय मानला जातो. कारण त्यात व्हिटॅमिन ई, ओमेगा-6 फॅटी अॅसिड आणि इतर पोषक घटक असतात. ते कापसाच्या साहाय्याने पापण्यांवर लावा आणि ते डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. रात्री हा घरगुती उपाय करून पहा आणि सकाळी स्वच्छ करा.

हेही वाचा – Skincare: व्यायाम करताना अशी घ्या त्वचेची काळजी! अन्यथा होऊ शकतं चेहऱ्याचं नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिप – वरील उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.