अनेक जण घरामध्ये रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली सुंदर बाग तयार करतात. तुम्हालाही जर बागकामाची आवड असेल, इच्छा असेल तर १२ महिने फुलणारी सदाफुलीची रोपं कुंडीमध्ये कशी लावायची ते पाहा. तसेच रोपांना कीड लागणार नाही आणि ती सदैव फुलांनी गच्च भरलेली कशी राहतील याबद्दल काही टिप्स पाहा.

या टिप्स यूट्यूबवरील MarathiGardentips_SantoshG नावाच्या चॅनेलवरून शेअर झाल्या आहेत. तुम्ही याआधी जर सदाफुलीची रोपे बागेत लावली नसतील, तर या फुलझाडांची रोपं कुंडीत कशी लावायची ते पाहू.

सदाफुलीचे रोप कुंडीत कसे लावावे? [How to grow flower plants?]

सर्वप्रथम बागकाम करताना वापरली जाणारी गार्डन सॉईल एका प्लास्टिकच्या कागदावर पसरून घ्या.
माती हलकी आणि भुसभुशीत व्हावी यासाठी गार्डन सॉईलमध्ये समप्रमाणात रायसेस मिसळून घ्या.
आता यामध्ये शेणखत घालून त्यामध्ये थोड्या प्रमाणात केळीच्या सालापासून बनवलेली पावडर हे घरगुती खत घालून घ्या.
शेवटी निंबोळीची पेंड आणि थोडी साफ पावडर घालून घ्या. यामुळे मातीमध्ये बुरशी असल्यास ती घालवण्यास मदत होईल.
आता रोपाचे लागवड करण्यासाठी तयार केलेले हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिसळून घ्यावे.

हेही वाचा : Home gardening : घरच्या कुंडीत ‘कोथिंबीर’ लावताना काय करावे, काय नको? पाहा या टिप्स

आता एका कुंडीमध्ये खाली थोडी शेंगदाण्याची टरफलं घालून घ्यावी. असे केल्याने रोपांना घातलेल्या पाण्याबरोबर कुंडीतील माती वाहून जाणार नाही.
रोपांसाठी तयार केलेले मिश्रण थोड्या प्रमाणात कुंडीमध्ये घालून घ्या.
आता नर्सरीमधून आणलेली सदाफुलीची सोपे पिशवीमधून सोडवून घ्यावी. तसेच रोपाच्या मुळाशी असलेली लाल माती मोकळी करून आपण तयार केलेल्या मिश्रणात मिसळून घ्यावी.
रोपाची मुळं थोडी मोकळी झाली की, ते रोप कुंडीच्या बरोबर मध्यभागी ठेवून द्या आणि आपण तयार केलेले उर्वरित मिश्रण कुंडीमध्ये भरून घ्या.
सर्वात शेवटी कुंडीमध्ये साधारण अर्धा तांब्या पाणी घालावे.
सदाफुलीची रोपे लावून तयार आहेत.
आता ही रोपं फुलांनी गच्च भरण्यासाठी काय करावे ते पाहा.

रोपांना अधिक बहर आणण्यासाठी काय करावे? [how to make plants bushy]

रोपांना जर अधिक फांद्या असतील तर आपसूकच रोपांना येणाऱ्या फुलांची संख्यादेखील अधिक असेल. त्यासाठी
तुमच्या रोपांच्या वरच्या बाजूला असणारा साधारण तीन ते चार पानं असलेला एक भाग तोडून / खुडून घ्यायचा आहे. त्या भागाला फुलं असतील तरीही काही हरकत नाही.
असे केल्याने खालच्या बाजूला पानांची आणि फांद्यांची अधिकाधिक वाढ होत राहील. ही क्रिया वेळोवेळी करत राहावी.
त्यासोबतच आवश्यकतेनुसार रोपांना खतं घालत राहावी.

हेही वाचा : Garden tips : उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याची योग्य वेळ काय? रोपांच्या वाढीसाठी पाहा ‘१०’ टिप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा पद्धतीने तुम्ही घरातील बागेमध्ये सदाफुलीची रोपे लावू शकता. सदाफुली हे १२ महिने टवटवीत राहणारे रोप आहे. तसेच सांगितलेल्या पद्धतीने जर या रोपांची काळजी घेतली तर सदाफुलीची हायब्रीड रोपंदेखील कायम चांगली आणि रंगीबेरंगी फुलं देतील, अशी माहिती @MarathiGardentips_SantoshG या यूट्यूब चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडीओमधून समजते.