फळांचा राजा आंबा चवीला गोड तर कधी आंबट असतो. कैरीतील आंबटपणा बहुतेकांना आवडत असला तरीही पिकलेला आंबा आंबट निघाला तर कोणाचाही भ्रमनिरास होईल. आंबा हा चवीला गोडच हवा. अशावेळी आंबा खरेदी करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपण खरेदी करत असलेला आंबा वरून जितका सुंदर आणि चविष्ट दिसत आहे, कापल्यानंतरही तो तितकाच रसदार आणि गोड निघेल.

मात्र, नुसते पाहून किंवा स्पर्श करून आंबा आंबट आहे की गोड हे सांगता येईल का? तर याचे उत्तर होय आहे. काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला सर्वोत्तम आंबा निवडण्यात मदत करू शकतात. आज आपण या टिप्स जाणून घेऊया.

भारतातील ‘या’ रेल्वे ट्रॅकवर आजही आहे ब्रिटिशांची मालकी; दरवर्षी द्यावा लागतो ‘इतका’ टॅक्स

आंब्याला स्पर्श करा. पिकलेले गोड आंबे स्पर्शास मऊ असतात, परंतु इतके मऊ नसतात की आपण स्पर्श करताच ते दबले जातील.

आंब्याचा वास घ्या आणि त्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल, अल्कोहोल किंवा औषधाचा वास येत नाही हे पाहा. कारण अनेकदा आंबे केमिकलच्या साहाय्याने पिकवले जातात आणि वाढवले ​​जातात. असे आंबे चवीला चांगले नसतात.

आंब्याच्या देठाजवळ वास घ्या. त्यातून गोड सुगंध येत असेल तर तो आंबा पिकलेला आहे.

दबलेले आंबे कधीही विकत घेऊ नका. दबलेले आणि एकाच बाजूला गडद झालेले आंबे आतून सडलेले असू शकतात.

गोल आकाराचे आंबे बहुतेक गोड असतात. फार पातळ आणि चेपलेले आंबे घेऊ नका.

रेषा किंवा सुरकुत्या असलेले आंबे घेऊ नका.

वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची रचना वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल नीट माहिती मिळवून आंबे खरेदी करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)