उन्हाळ्यात शिजवलेले अन्न मोठ्या प्रमाणात खराब होत असते. दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शिजवलेल्या अन्नपदार्थांमध्ये बुरशी वेगाने वाढू लागते. त्यामुळे उन्हाळ्यात शिजवलेले अन्न जास्त काळ ताजे ठेवणे हे एक आव्हान असते. पण आता बहुतेकांच्या घरी फ्रीज असल्याने ही समस्या बर्याच प्रमाणात कमी झाली आहे. मात्र कामाच्या गडबडीत अनेकदा अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचा राहून जातो आणि तो खराब होतो.
यामुळे आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे उन्हाळ्यात अन्नपदार्थ खराब होण्यापासून कसा वाचवू शकता.




उन्हाळ्यात शिजवलेले अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून काय करावे?
१) जेवणात गरम मसाल्यांचा वापर कमी करावा.
उन्हाळ्यात गरम मसाले, लसूण, आले मोठ्या प्रमाणात असलेले पदार्थ लवकर खराब होतात. अशा वेळी अन्न दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी शक्य तितके कमी मसाले वापरावेत. यामुळे तुमच्या शरीरातील उष्णताही कमी होईल. म्हणूनच आहारतज्ज्ञ उन्हाळ्यात कमी तेलकट आणि मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात.
२) जेवणात टोमॅटो, कांद्याचा वापर कमी करा
टोमॅटो आणि कांद्याशिवाय कोणत्याही भाज्या किंवा कोणत्याही पदार्थ्यांना चव लागत नाही. पण स्वयंपाकात याचा कमीत कमी वापर केल्याने अन्न जास्त काळ टिकून राहतो. जर तुम्हाला टोमॅटो, कांद्याशिवाय कोणताही पदार्थ खायला आवडत नसेल तर तुम्ही तो पदार्थ शिजवल्यानंतर तीन ते चार तासांच्या आत खाऊन संपवा.
३) अन्न वारंवार गरम करू नका
बहुतेक लोकांना थंड झालेले पदार्थ खायला आवडत नाही. म्हणून ते कोणताही पदार्थ आधी गरम करतात आणि मगच खातात. परंतु कोणताही पदार्थ एकपेक्षा जास्त वेळा गरम केल्यास तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच उन्हाळ्यात अन्नपदार्थ वारंवार गरम करणे टाळा.
४) इतक्या तासांनी पदार्थ फ्रीजमध्ये स्टोर करा
अनेक वेळा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही अन्न खराब होते. याचे एक सामान्य कारण म्हणजे ते बराच वेळ बाहेर ठेवल्यानंतर स्टोअर केले जाते.
यामुळे तज्ज्ञांकडून नेहमी स्वयंपाकाच्या एक ते दोन तासांनंतरच अन्न फ्रीजमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवण्याची शिफारस करतात. फ्रीजमध्ये जास्त गरम अन्न ठेवल्याने देखील तो पदार्थ लवकर खराब होते.
५) पदार्थ मिक्स करू नका
अनेकांना उरलेले पदार्थ एकाच भांड्यात मिक्स करून ठेवण्याची सवय असते, त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक शिजवलेला पदार्थ वेगवेगळ्या स्वच्छ भांड्यात स्टोअर करा, यामुळे पदार्थ जास्त वेळ ताजा राहू शकतो