Monsoon Hair Care Tips : कडक उन्हाच्या झळा सहन केल्यानंतर आता सर्वांना दिलासा देणाऱ्या मान्सूनला लवकरच सुरुवात होईल, या ऋतुमध्ये केवळ सर्दी, खोकला नाही तर केसांशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात अनेकांना केस गळतीची समस्या जाणवते, याशिवाय केसांमध्ये कोंडा, टाळूवर खाज सुटणे, केस खराब होणे आणि इन्फेक्शन होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत केसांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे टाळूवर कोंडा होण्यास सुरुवात होते. यामुळे टाळूवर खाज येते. टाळूवर जास्त प्रमाणात सेबम जमा झाल्यास केस कमकुवत होतात आणि केसगळतीची समस्या वाढते. यामुळे पावसाळ्यात केसांसंबंधित समस्या कशा टाळायच्या आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.. एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत स्किनक्राफ्ट लॅबोरेटरीजचे सह-संस्थापक आणि सीईओ चैतन्य नालन यांनी सांगितले की, सेबम आणि मृत त्वचेचे मिश्रण फॉलिकल्समध्ये तयार होते यामुळे तुमच्या स्कॅल्पमध्ये बॅक्टेरिया वाढीस चालना मिळते. यामुळे टाळूला खाज सुटणे, केसांमधून दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या जाणवतात. चैतन्य नालन यांच्या मते, पावसाळ्यात केसांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर टाळू भिजवणे टाळले पाहिजे, आठवड्यातून तीनदा तुम्ही टाळू आणि केस स्वच्छ धुवा. केसांच्या पोतनुसार सौम्य शाम्प्यूचा वापर करा, पावसाच्या पाण्यात विविध प्रकारचे बॅक्टेरिया असतात, जे तुमच्या टाळूच्या त्वचेला त्रास होतो. पावसाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही नियमित टाळूचे कोमट तेलाने मालिश करा. तसेच तुम्ही टी ट्री ऑइलचे थेंब कोमट खोबरेल तेलात घाला, हे मिश्रण केस धुण्याच्या अर्ध्या तास आधी तुमच्या टाळूला पूर्णपणे मसाज करा. टी ट्री ऑइलमध्ये केसांच्या समस्या दूर ठेवणारे काही गुणधर्म असतात जे टाळूच्या संसर्गासही प्रतिबंध करण्यास मदत करतात. यातील खोबरेल तेल टाळूवरील अस्वच्छता दूर करण्यास प्रोत्साहन देते. तसेच फॉलिक्लमध्ये जमा झालेले सेबम प्लग बाहेर काढते. पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी पुढील काही उपाय १) कोंड्याची समस्या पावसाळ्यात केसात मोठ्याप्रमाणात कोंडा तयार होतो. यासाठी तुम्ही केसांना नियमित तेल लावा किंवा केसांवर योग्य टॉनिक आणि सीरमचा वापर करा. याशिवाय काही घरगुती उपाय करु शकता. केसांना टाळूपासून टोकापर्यंत तेल लावण्याऐवजी केसांच्या टोकावर लक्ष केंद्रित करा. यामुळे केस केवळ व्यवस्थितीतच नाही तर नितळ आणि निरोगी होतात २) योग्य शॅम्प्यूचा वापर करा तुमच्या केसांची पोत लक्षात घेऊन योग्य शॅम्प्यूची निवड करा, यामुळे केसांमधील स्कॅल्पच स्वच्छ होणार नाही प्रदुषण आणि वेगवेगळ्या कारणांमुळे केसांमध्ये तयार होणारी खाण स्वच्छ करण्यास मदत होईल. ३) स्कॅल्प स्क्रब वापरा स्कॅल्प स्क्रबने केवळ केसांमधील निरुपयोगी उत्पादनांची वाढ दूर होत नाही तर पावसाळ्यात तुमच्या स्कॅल्पला विविध समस्यांपासून दूर ठेवता येतात. पावसाळ्यात अनेकांना केसगळतीचा सामना करावा लागतो अशावेळी योग्य स्कॅल्प स्क्रबची निवड करणे फायदेशीर ठरू शकते.