How To Keep Pigeons Away From Balcony: दादरचा कबुतरखाना, मागील काही आठवडे प्रचंड चर्चेत असलेला विषय. BMC तर्फे दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून हा कबुतरखाना बंद करण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील विशेषतः दादरमधील जैन धर्मियांनी कबुतरांसाठी आंदोलन पुकारलं, दादर परिसरातील आंदोलन आज पेटलेलं असताना मुळात ज्या कारणाने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय झाला ते म्हणजे “कबुतरामुळे आरोग्याला निर्माण होणारा धोका”..अशातच फ्लॅटमध्ये राहणारे लोक कबुतरांनी त्राससेले असतात. घराच्या बाल्कनीपासून ते छतापर्यंत सगळीकडे कबुतरं येतात. कबुतरांच्या आवाजामुळे अनेकांना त्रास होतो. कितीही पळवून लावलं तरी कबुतरं पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतात.एकदा त्यांनी घरटं तयार केलं तर ते बाहेर निघतच नाहीत. त्यात कबुतरांच्या विष्ठेच्या घाण वासानं अनेकांना एलर्जी होते. याच कबुतरांचा त्रास टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता..यामुळे कधीच कबूतर पुन्हा येणार नाही.
व्हिनेगर
कबुतरांना व्हिनेगरचा वास आवडत नाही, त्यामुळे कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. २-३ चमचे व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळून मिश्रण तयार करून बाल्कनी पुसून काढा.व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एक परिणामकारक उपाय आहे ज्यामुळे कबुतरांची विष्ठा निघून जाईल आणि हट्टी डाग निघून जाण्यास मदत होईल. एक कप व्हिनेगरमध्ये २ चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि हे मिश्रण डागांवर लावा १० ते १५ मिनिटं तसंच ठेवा. जेणेकरून डाग व्यवस्थित मऊ राहतील. नंतर एका स्क्रबरने हलक्या हातानं रगडून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या.
काळी मिरी आणि लाल मिरची
कबुतरांना बाल्कनीपासून दूर ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे काळी मिरी आणि लाल मिरचीचा स्प्रे. तुम्ही दोन्ही मिरची पावडर पाण्यात वेगवेगळे मिसळून फवारणी करू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काळी आणि लाल तिखट मिसळूनही पेस्ट बनवू शकता. या पद्धतींनी कबूतर तुमच्या बाल्कनीत येणार नाहीत.
डिंक किंवा मध
बाल्कनी आणि खिडकीवर घाण पसरवणाऱ्या कबुतरांना चिकट जागेवर बसणे कधीही आवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी डिंक तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही बाल्कनीमध्ये विविध ठिकाणी डिंक पसरवू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही मध देखील वापरू शकता. या पद्धतींचा वापर केलात तर कबूतर तुमच्या बाल्कनीमध्ये दिसणार नाहीत.
काटेरी वनस्पती
काटेरी वनस्पती खिडकीत असल्यास यामुळे कबुतरं खिडकीत येण्यास घाबरतात. यामुळे खिडकीचा लुकही सुंदर होण्यास मदत होते. त्यामुळे एखादं निवडुंगाचं छोटं रोपं ठेवू शकता.
लसणाचे रोप
तुम्ही लसणाचे रोप लावू शकता किंवा त्वरित परिणाम हवा असेल तर लसूण स्प्रे सोल्यूशन देखील बनवू शकता जे पक्ष्यांना दूर ठेवण्यास मदत करेल. यासाठी लसूण, पाणी आणि व्हिनेगर मिसळा, थोड्यावेळ नीट सर्व अर्क उतरून पाणी राहूद्या व मग कबुतरं सतत येतात अशा ठिकाणी स्प्रे करा.
पुदिन्याची पाने
बाल्कनीत पुदिन्याची पाने ठेवू शकता पुदिन्याच्या पानाच्या दर्पामुळे पक्षी या पानांपासून अधिक दूर राहतात.
चमकदार गोष्टी
बाल्कनीत चमकदार गोष्टी ठेवा, चमकदार गोष्टी असतील तिथे कबूतर जाणे टाळतात. आरसे असणारे ड्रीमकॅचर किंवा सीडी वापरलेल्या शोभेच्या वस्तू खिडकीजवळ ठेवण्याचा सल्ला दिला जातो.