Water Tank Cooling Tips in Summer: उन्हाळ्यामध्ये पाण्याची टाकी वापरणे ही सामान्य गोष्ट आहे. पण कडक उन्हामुळे पाण्याची टाकीतील पाणी गरम होते. अशामध्ये तुम्हाला काही सोप्या उपायांच्या मदतीने पाण्याच्या टाकीतील पाणी एकदम थंड आणि गार ठेवू शकता. खरे तर कित्येक घरांमध्ये टाकी मोकळ्या छतावर ठेवली जाते, ज्यामुळे टाकीवर फक्त थेट सूर्यप्रकाश पडतो पण आर्द्रता आणि उष्णतेमुळे टाकीदेखील गरम होते. येथे सांगितलेले काही उपाय तुम्हाला पाण्याची टाकी थंड ठेवण्यासाठी मदत करतील.

उन्हाळ्यात पाण्याची टाकी थंड कशी ठेवावी?

पाण्याच्या टाकीला हलका रंग देता येऊ शकतो :

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

पाण्याच्या टाकीला थंड ठेवण्यासाठी तुम्ही या टाकीला हलका रंग देऊ शकता. खरे तर गडद रंग उष्णता शोषून घेतो त्यामुळे टाकी लवकर गरम होते. अशातच तुम्ही हलका रंग टाकीला देऊ शकता. त्यामुळे टाकीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा प्रभाव तुलनेने बराच कमी होतो आणि पाणी दीर्घकाळ थंड राहू शकते.

पाण्याच्या पाइपला झाका किंवा कव्हर घाला:

पाण्याच्या टाकीसह पाण्याच्या पाइपमुळेदेखील पाणी गरम होते. अशा वेळी पाइपला उन्हापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पेपर किंवा कव्हर वापरून झाकू शकता. तसेच मार्केटमध्ये अतिउष्णतेपासून वाचविणारी कव्हर्स मिळतात. अशा प्रकारे पाइप कव्हर करून आता पाण्याची टाकीतील पाणी थंड ठेवू शकता.

उन्हाळ्यात पाण्याची टाकी थंड कशी ठेवावी? फॉलो करा ५ सोपे उपाय ( फोटो सौजन्य-Amazon)
उन्हाळ्यात पाण्याची टाकी थंड कशी ठेवावी? फॉलो करा ५ सोपे उपाय ( फोटो सौजन्य-Amazon)

हेही वाचा – टक…टक…टक! छताच्या पंख्याच्या आवाजामुळे वैतागला आहात? हे पाच सोपे उपाय ठरतील फायदेशीर

पाण्याच्या टाकीची जागा बदला :

उन्हाळ्यात टाकी छतावर ठेवल्याने त्यातील पाणी गरम होते. या प्रकरणात, आपण पाण्याच्या टाकीचे ठिकाण बदलू शकता. यासाठी सावलीची जागा निवडा, जेणेकरून सूर्य टाकीवर पडणार नाही आणि पाण्याचे तापमान बराच काळ कमी राहील.

उन्हाच्या सावलीमध्ये करा निवडा :

उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या टाकीवर सतत ऊन पडत असल्यामुळे पाणी जास्त गरम होते. अशात टाकीवर शेड बांधू शकता. त्यामुळे टाकी गरम होणार नाही आणि पाण्याचे तापमान सामान्य राहील.

हेही वाचा – तुमच्याही हेल्मेटचा वास येतोय का? ‘या’ ५ टीप्स वापरुन दुर्गंधी कायमची दूर करा

टाकीमध्ये बर्फ टाका :
जर तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल आणि जास्त पाहुणे असतील तर पाण्याच्या टाकीतील पाणी थंड राहण्यासाठी बर्फ वापरू शकता. हा सर्वात सोपा उपाय आहे. त्यासाठी मार्केटमध्ये बर्फाची लादी घेऊन या आणि बर्फ पाण्याच्या टाकीमध्ये टाका. त्यामुळे पाण्याच्या टाकीमधील पाणी काही मिनिटांमध्ये थंड होईल. तसेच यामध्ये टाकीवर उन्हाचा परिणाम होणार नाही.