Helmet Cleaning Tips: कार चालवताना जसे सीट बेल्ट लावणे गरजेचे असते तसेच दुचाकी चालवताना हेल्मेट गरजेचे असते. कित्येक लोक रोज हेल्मेट वापरतात पण त्याच्या स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करतात. रोज वारंवार हेल्मेट वापरून ते खराब होऊन जाते. एवढं नव्हे तर जास्त दिवस हेल्मेट वापल्याने त्यामध्ये फक्त धूळ साचत नाही तर धामामुळे हेल्मेटचा दुर्गंध देखील येतो. म्हणूनच वेळच्या वेळी हेल्मेट साफ करणे गरजेचे आहे. तुम्हाला जर हेल्मेट कसे साफ करावे माहित नसेल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला सांगतो. हेल्मेट साफ करण्यासाठी ५ सोप्या पद्धती आम्ही सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहज सफाई करु शकता आणि त्याचा वास देखील दूर होईल.

हेल्मेट साफ करण्यासाठी ५ सोप्या टीप्स

शँपू वापरा : हेल्मेट साफ करण्यासाठी तुम्ही शँपूचा वापर करू शकता. हेल्मेटच्या आतील पॅडिंगला शँपू लावा, सर्वत्र घासून घेऊ पाण्याने स्वच्छ करा. हेल्मेट सहज साफ केला जातो.

तुमच्या हेल्मेटचा वास येतोय? जाणून घ्या कसे साफ करावे( फोटो फ्रिपीक
तुमच्या हेल्मेटचा वास येतोय? जाणून घ्या कसे साफ करावे( फोटो फ्रिपीक

हेही वाचा – हेल्मेट साफ करण्यासाठी वापरा ५ सोप्या टीप्स, मिनिटांमध्ये दूर होईल वास

बेकिंग सोडा वापरा:
बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही हेल्मेट सहज स्वच्छ करू शकता. यासाठी हेल्मेट स्वच्छ पाण्याने धुवावे. आता हेल्मेटमध्ये बेकिंग सोडा टाका आणि काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळाने पाण्याने हेल्मेट स्वच्छ करा. यामुळे हेल्मेटचा वास लगेच निघून जाईल

सौम्य साबणाची मदत घ्या:
हेल्मेट स्वच्छ करण्यासाठी सौम्य साबण वापरणे देखील चांगले आहे. त्यासाठी सौम्य साबण लावून हेल्मेट धुवावे. यामुळे हेल्मेट स्वच्छ होईल. यासोबतच हेल्मेटचा वासही निघून जाईल.

ब्लीचने स्वच्छ करा:
तुम्ही ब्लीचिंग पावडरच्या मदतीने हेल्मेटला दुर्गंधी मुक्त करू शकता. यासाठी १ चमचा ब्लिचिंग पावडरमध्ये पाणी घालून मिश्रण तयार करा. आता या मिश्रणाने हेल्मेट स्वच्छ करा. यामुळे हेल्मेटचा दुर्गंधी काही मिनिटांतच निघून जाईल.

तुमच्या हेल्मेटचा वास येतोय? जाणून घ्या कसे साफ करावे( फोटो फ्रिपीक
तुमच्या हेल्मेटचा वास येतोय? जाणून घ्या कसे साफ करावे( फोटो फ्रिपीक

हेही वाचा – DIY Cleaning Tips: किचन टाईल्सपासून ओव्हनपर्यंत, साफसफाईसाठी वापरा व्हिनेगर! जाणून घ्या कसे वापरावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किटसह साफ करा:
हेल्मेट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बाजारातून हेल्मेट किट देखील खरेदी करू शकता. हेल्मेट किटने स्वच्छ केल्यावर तुमचे हेल्मेट सहजत चमकेल. यासोबतच हेल्मेटचा दुर्गंधही नाहीसा होऊन हेल्मेट एकदम नवीन दिसेल.