How To Layer Skincare Products In Summer : उष्ण आणि दमट उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते, कारण यादरम्यान त्वचेवर पुरळ, तर डिहायड्रेशन आणि जळजळ होण्याची शक्यता जास्त असते. या समस्या उद्भवण्याची मुख्य कारणे उष्णता, दमट हवामान आणि सूर्याची हानिकारक किरणे आहेत. याव्यतिरिक्त, चेहऱ्यावर जास्त उत्पादनांचे (प्रोडक्ट्स) थर लावल्याने किंवा क्रीम वापरल्याने त्वचेचे छिद्र बंद होऊ शकतात. पण, याचा अर्थ असा नाही की, उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेशनची आवश्यकता नाही. कॉस्मेटिक त्वचारोगतज्ज्ञ आणि ईडन स्किन क्लिनिकच्या संस्थापक डॉक्टर अमिषा महाजन यांच्या मते, उन्हाळ्यात खासकरून दमट हवामानात स्मार्ट लेयरिंग करणेसुद्धा गरजेचे आहे.

सौम्य क्लीन्सर निवडा (Choose Lightweight Cleanser)

तुमच्या दिनचर्येची सुरुवात सौम्य क्लीन्सरने करा, जे तुमच्या त्वचेवरील घाम आणि जास्तीचे तेल काढून टाकते, त्यामुळे जेल किंवा फोम आधारित क्लीन्सर गरम हवामानात सगळ्याच त्वचेच्या प्रकारांसाठी चांगले ठरू शकतात.

हायड्रेटिंग टोनर किंवा मिस्ट लावा (Layer With Hydrating Toner Or Mist)

चेहरा हलक्या हाताने स्वच्छ केल्यानंतर गुलाबपाणी, ग्लिसरीन, कोरफड इत्यादी घटकांनी समृद्ध असलेले हायड्रेटिंग टोनर किंवा फेशियल मिस्ट तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा जड किंवा तेलकट न दिसता लगेच त्वचा हायड्रेट होते.

वॉटर बेस सीरम (Use Water Based Serum )

तुमचे सीरम जाड आणि तेलकट नसून, सीरम वॉटर बेस किंवा जेल बेस असावेत आणि त्यात सक्रिय घटक असावेत, जे लगेच गुण देतात. उदाहरणार्थ, नियासिनमाइडसमृद्ध सीरम तेल त्वचा उजळण्यास मदत करतात आणि हायल्यूरॉनिक ॲसिड कोरड्या त्वचेला हायड्रेट करतात. व्हिटॅमिन सी त्वचेला उजळ करते किंवा अँटीऑक्सिडंट संरक्षण प्रदान करते. वॉटर बेस सीरम त्वचेत लवकर शोषले जातात आणि चिकटपणा चेहऱ्यावरून काढून टाकतात.

हलके आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर (Use lightweight And Non-Comedogenic Moisturiser)

उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतो म्हणून तुम्ही मॉइश्चरायझर वापरणे सोडून द्यावे असे नाही. तुम्ही हलके, नॉन-कॉमेडोजेनिक आणि जेल-बेस्ड किंवा वॉटर-बेस्ड क्रीम/लोशन किंवा ग्रीन टी, अ‍ॅलोवेरा, स्क्वालीन इत्यादी हायड्रेटिंग घटक असलेले क्रीम/लोशन वापरू शकता. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हायड्रेटिंग सीरम वापरा आणि जर तुमची सनस्क्रीन हायड्रेशन देत असेल तर मॉइश्चरायझर वापरू नका.

मॅट बेस्ड ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा (Matte Based Sunscreen)

शेवटचा टप्पा नेहमीच सनस्क्रीन असावा आणि मॅट किंवा जेल फिनिशसह ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF 30 सनस्क्रीन लावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जास्त थर चेहऱ्यावर लावू नका (Avoid Hoarding Products On Skin)

एकाच दिनचर्येत अनेक प्रकारच्या उत्पादनांचे थर चेहऱ्यावर लावू नका. उन्हाळ्यात जास्त उत्पादने लावल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते किंवा चेहऱ्यावरील छिद्रे बंद होऊ शकतात. त्यामुळे सकाळी व्हिटॅमिन सी आणि रात्री नियासिनमाइड किंवा एएचए वापरा.