How to lighten dark circles: बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली अगदी कमी वयातच तरुण तरुणींच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ पाहायला मिळतात. अपूर्ण झोप, तणाव या सागळ्यात तरुणाई पूर्णपणे अडकली आहे. त्यामुळे यासारखे अनेक आरोग्यासंबंधित तक्रारी उद्भवतात. यासाठी अनेकजण डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधं घेतात. मात्र जास्त गोळ्या औषधही आरोग्यावर परिणाम करु शकतात. त्यामुळे तुम्हीही जर या समस्येनं त्रस्त असाल, तुमच्याही डोळ्याखाली काळे वर्तुळं दिसत असतील तर काही घरगुती उपयांनी ही काळी वर्तुळ जाण्यास मदत होईल..चला तर पाहुयात काय आहेत हे उपाय..
काकडी
काळे वर्तुळ कमी करण्यासाठी, काकडी वापरता येते. काकडीचा तुकडा कापून घ्या. थंड होण्यासाठी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. काकडीचे तुकडे काही वेळ डोळ्यांवर राहू द्या. १० ते १५ दिवस डोळ्यांवर ठेवा. त्यानंतर ते डोळ्यांमधून काढून टाका. यामुळे तुमच्या डोळ्यांना खूप थंडावा मिळेल.
टोमॅटो
तुम्ही सर्वात आधी टोमॅटोचा रस एका भांड्यात घ्या. त्यात १ चमचा लिंबाचा रस घाला. आता कापूस डार्क सर्कलवर लावा. काही काळ तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. हे त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करते.
ग्रीन टी बॅग
ग्रीन टीचे तसे अनेक फायदे आहेत. ग्रीन टी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असून त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर त्यांचा वापर केला जाऊ शकतो. यानंतर ग्रीन टी बॅग्ज फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर त्यांना बाहेर काढा. त्यांना १५ मिनिटे डोळ्यांवर राहू द्या. यामुळे डोळ्यांना खूप आराम मिळेल. यामुळे डोळ्यांची सूज दूर होते.
गुलाब पाणी
सर्वात आधी एका भांड्यात गुलाबपाणी घ्या. त्यात कापसाचा गोळा भिजवून २० मिनिटे डोळ्यांवर ठेवा. काही काळ तसेच राहू द्या. तुम्ही ते रोज सकाळी वापरू शकता. यामुळे काळे वर्तुळची समस्या दूर होण्यास मदत होईल.
दूध
दुधात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. यासाठी दूध थंड करा. दुधात कापूस बुडवून घ्या. डोळ्यांवर ठेवा. १० ते १५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते डोळ्यांमधून काढून टाका. त्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होण्यास मदत होते.
हेही वाचा >> Skincare: तांदळाच्या पिठाने उजळेल त्वचा अन् पिंपल्स होतील दूर; घरच्या घरी बनवा तांदळाचं स्क्रब
मध आणि लिंबू
मिश्रण एका भांड्यात थोडे मध आणि लिंबाचा रस मिसळा. ते प्रभावित त्वचेवर लावा. २० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. यामुळे तुम्हाला काही दिवसात फरक दिसू लागेल.