डबा; मग तो शाळेचा असो किंवा ऑफिसचा सकाळी उठून आपली आई आपल्याला गरमागरम फुलके, चपाती, घडीच्या पोळ्या बनवून देते. इतकेच नाही, तर नाश्त्याला त्याच गरमागरम आणि टम्म फुगलेल्या पोळीला मस्त तूप लावून खायला घालते. मात्र, बनवलेल्या पोळ्या जितक्या पटापट संपतात त्यापेक्षा पोळ्या बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो हे स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकालाच माहीत असेल. मात्र, सध्या झटपट आणि गोल पोळ्या बनवण्यासाठी रोटी मेकरसारखी अनेक साधने बाजारात उपलब्ध आहेत. तरीही आपण घरगुती जुगाड किंवा घरगुती युक्त्या वापरून गोल पोळ्या बनवण्यासाठी ताटली, डब्याचे झाकण इत्यादींचा वापर करतो. अशा युक्त्यांचा शक्यतो नवीन स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तींकडून अधिक वापर होत असला तरी त्यांचा उपयोग नक्कीच होतो.

चंद्रासारख्या गोल पोळ्या बनवण्यासाठी अशा विविध कल्पनांचा वापर केला जातो. तशीच झटपट पोळ्या लाटण्यासंबंधीची एक भन्नाट ट्रिक सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @momsgupshup777 या अकाउंटवरून एका मिनिटाच्या आत आणि एकाच वेळी पाच पोळ्या कशा लाटायच्या हे दाखवले गेले आहे. या व्हिडीओनुसार सर्वप्रथम आपण कणीक मळतो तशी कणीक मळून घ्या. नंतर त्याचे एकसमान गोळे करून घ्या. आता प्रत्येक गोळ्याला पीठ लावून, ते एकमेकांवर ठेवून, लाटण्याने पोळ्या लाटतो अगदी त्याच पद्धतीने हा गोळ्यांचा ढीग लाटून घेतला आहे. मग अशा प्रकारे व्हिडीओच्या शेवटी आपल्याला एका मिनिटाच्या आत पाच पोळ्या एकाच वेळी लाटून दाखवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Viral video : लायटर नव्हे, ‘हाताच्या बोटाने’ पेटवला गॅस स्टोव्ह! व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून व्हाल चकित…

खरे तर ही किचन ट्रिक एकदा करून बघायला काहीच हरकत नाही, असे हा व्हिडीओ बघून आपल्याला वाटत असेल, तर नेटकऱ्यांच्या त्यावरील प्रतिक्रिया नक्की वाचा. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या यावर मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नेटकरी नेमके काय म्हणत आहेत पाहा.

“मी एक पोळी लाटते तेव्हा ती पोळपाटाला चिकटून बसते. त्यामुळे ही ट्रिक नक्कीच काम करणार नाही,” असे एकीने लिहिले आहे. “केवळ व्ह्युज आणि लाईक मिळवण्यासाठी अशी कॅप्शन लिहून हा खोटा व्हिडीओ का शेअर केला आहे?”, असे दुसऱ्याने विचारले. “असं होऊच शकत नाही. सगळ्या गोळ्यांची मिळून एक जाड पोळी बनेल.” असे तिसऱ्याने म्हटले आहे. चौथ्याने, “मित्रांनो, मी ही ट्रिक वापरून पाहिली आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे अजिबात काही होत नाही. एकत्र त्या एकमेकांना चिकटून बसतात; नाही तर एकच जाड पोळी तयार होते,” असा त्याचा अनुभव सांगितला आहे. “पोळ्या एकमेकांना चिकटू नयेत यासाठी पीठ आणि तेल जास्त लावा,” असा सल्ला पाचव्याने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवरील @momsgupshup777 या अकाउंट शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २.४ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.