cake-main
उन्हाळ्यात सुखावणारी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे आंबा. आंब्यापासून मँगो शेक, मँगो लस्सी, मँगो आईस्क्रिम, आंब्याचे पन्हे अशा अनेक गोष्टी बनवता येतात. एगलेस मँगो केक हा सुद्धा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जाणून घेऊ मँगो केकची रेसिपी.

ingredients

साहित्य
मैदा – १ कप (११० ग्रॅम)
आंबा – १ (३०० ग्रँम)
कंडेन्स्ड दूध – अर्धा कप (२०० ग्रॅम)
पिठी साखर – अर्धा कप (१०० ग्रॅम)
दूध – ३ ते ४ कप
बटर १/३ कप (८० ग्रॅम)
काजू – २ चमचे
बेदाणे – २ चमचे
बेकिंग पावडर – १ चमचा
बेकिंग सोडा – पाव चमचा

कृती
मैद्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून चांगले एकत्र करा. दोनदा मिश्रण ढवळून घ्या. दुसऱ्या एका भांड्यात बटर, आंब्याचा गर आणि कंडेन्स्ड दूध घालून चांगले ढवळून घ्या. पिठी साखर घालून पुन्हा चांगले ढवळा. काजूचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. बेदाणा स्वच्छ करून घ्या. ओवनला १८० डिग्री सेंटिग्रेडला प्रिहिट करा. केकच्या भांड्याला आतल्या बाजूने तूप अथवा बटर लावून घ्या. कंटेनरच्या तळात बटर पेपर परसवून घ्या. बटर पेपरलासुद्धा बटर लावून घ्या. मैदा व बेकिंग पावडरचे सुके मिश्रण आणि कंडेन्स्ड दूध व आंब्याचा गर असलेले मिश्रण एकत्र करा. हे बॅटर चांगले ढवळून घ्या. त्यात गुठळ्या राहाणार नाहीत याची खात्री करून घ्या. आता या बॅटरमध्ये दूध, काजूचे तुकडे आणि बेदाणे घालून पुन्हा ढवळून घ्या. तयार झालेले बॅटर कंटेनरमध्ये ओतून बॅटरचा पृष्ठभाग एकसारखा करून घ्या. आधीच गरम करून घेतलेल्या ओवनमध्ये हा कंटेनर ठेऊन १८० डिग्री सेंटिग्रेडला २५ मिनिटांसाठी सेट करा. २५ मिनिट झाल्यावर केक ब्राऊन झाला आहे का ते तपासून पाहा. केकचा रंग बदलला नसल्यास पुन्हा १० ते १५ मिनिटांसाठी केक ओवनमध्ये सेट करायला ठेवा. केकचा रंग ब्राऊन झाला याचा अर्थ केक तयार झाला आहे. खात्री करून घेण्यासाठी केकमध्ये सुरी टोचून पाहू शकता. केक सुरीला चिकटला नाही म्हणजे केक तयार झाला असे समजावे. ओवनमधून काढून केक थंड होण्यासाठी ठेऊन द्या. केकच्या भांड्यातून केक बाहेर काढण्यासाठी सुरी केकच्या कडेने फिरवून कंटेनर उपडा करून केक प्लेटमध्ये काढून घ्या. केकला लावलेला बटर पेपर काढून केकचे तुकडे करून घ्या.

cake1

टीप
केकचे बॅटर अतिशय घट्ट अथवा पातळ होता कामा नये.
प्रथम केकला २५ मिनिटांसाठी बेक करून घ्या. गरजेनुसार अधिक बेक करा

cake3

cake4

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौजन्य : निशा मधुलिका