Whatsapp हे एक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. भारतात मेसेज पाठवण्यासाठी सर्वाधिक Whatsapp वापरले जाते. या अ‍ॅपवर युजर्सना अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे चॅटिंग आणखी सोपे आणि सुरक्षित झाले आहे. या अ‍ॅपद्वारे फोटो, व्हिडिओ आणि संदेश पाठवणं सोपं आहे. पण अनेकदा असं होतं की, समोरची व्यक्ती आपल्यावर रागावते किंवा कोणत्याही कारणाने त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक करते. त्यामुळे आपण त्याला मेसेज करू शकत नाही. पण आपण ब्लॉक लिस्टमध्ये असलो, तरी त्या व्यक्तीला मेसेज करू शकतो. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही युक्त्या सांगणार आहोत. 

या सोप्या युक्तीने तुम्ही मेसेज पाठवू शकता..

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
live-in partner killed and hung the body on tree
नागपूर : खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…

व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केल्यानंतर, अनेकांना असे वाटते की ग्रुप तयार करून तुम्ही ब्लॉक केलेल्या मित्राला सहज अ‍ॅड करू शकता आणि बोलू शकता. परंतु तुम्ही हे अजिबात करू शकत नाही. यासाठी तुम्हाला दुसऱ्या मित्राची मदत घ्यावीच लागेल. कॉमन फ्रेंडसह, तुम्ही एक ग्रुप तयार करू शकता आणि ज्यांना तुम्हाला मेसेज करायचा आहे त्यांना देखील त्यात अ‍ॅड करू शकता. जर मेसेज खासगी असेल तर तुम्ही त्या कॉमन फ्रेंडला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडण्यास सांगू शकता. यानंतर, तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलू शकता आणि त्याला मेसेज पाठवू शकता.

स्वतःला अनब्लॉक कसे करावे

स्वतःला अनब्लॉक करण्यासाठी, प्रथम WhatsApp पुन्हा इंस्टॉल करा. यानंतर, ज्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्याच्याशी पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ते अनब्लॉक करण्यासाठी तुम्ही या टीप्स फॉलो करू शकता.

-सर्व प्रथम WhatsApp उघडा. त्यानंतर Settings आणि नंतर Account या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर Delete My Account हा पर्याय निवडा.

– यानंतर तुम्हाला एक पॉप-अप मेसेज मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व ग्रुप्समधून काढून टाकण्यासाठी आणि हिस्ट्री क्लिअर करण्यासाठी अलर्ट मेसेज मिळेल.

– या मेसेजवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला देश आणि फोन नंबर निवडण्याचा पर्याय मिळेल.

– यानंतर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट डिलीट होईल.

– त्यानंतर तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store मधून अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

– तुम्ही नवीन व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोक आपोआप जोडले जातील.

– त्यानंतर तुम्हाला ब्लॉक केलेली कॉन्टॅक्ट लिस्ट शोधावी लागेल आणि तुम्ही त्या मित्राशी पुन्हा कनेक्ट करू शकता.