How To Peel Garlic Easily Kitchen Tips: मराठमोळ्या घरात लसूण नाही असं फार क्वचितच होत असेल. लसणाचा वापर कच्चा व शिजवून दोन्ही पद्धतीने केला जातो. अगदी साध्या वरणाला लसणाची फोडणी दिली की लगेच दाल तडका तयार होतो. हिरव्या लसणाची चटणी, लाल लसणाची चटणी, इतकंच नव्हे तर लसणाचं लोणचं सुद्धा अगदी रोजच्या जेवणात सुद्धा वेगळाच स्वाद येतो. आरोग्यासाठी सुद्धा लसूण बराच फायदेशीर मानला जातो. चव, आरोग्य दुहेरी फायदे असतानाही लसूण हा डोक्याला ताप ठरू शकतो. याचं कारण म्हणजे लसूण सोलणे. लसूण सोलताना अलीकडे अनेकजण लसूण पाण्यात भिजवून ठेवतात पण यानंतरही लसूण सोलताना नखं दुखतात. आज आपण दोन अशा ट्रिक पाहणार आहोत ज्याने लसूण सोलणे केवळ सोपे नाहीतर झटपटही होऊ शकेल.

लसूण सोलताना वेळ वाचवतील ‘या’ सोप्या टिप्स

१) लसणाचा कांदा मोकळा करून घ्या. लसूण पाण्यात भिजवून थोडा नरम होतो हे आपण जाणतो पण लसणाची सालं आपोआप निघायला हवी असतील तर हे पाणी थोडं कोमट करून घ्या. या पाण्यात थोडा बेकिंग सोडा घालून १५ ते २० मिनिट लसूण यात भिजवून ठेवा. यानंतर तुम्ही लसूण सोलताना नखांचा वापर करण्याऐवजी दोन बोटांच्या मध्ये पकडून चिमटीने साल दूर करा. लसणाच्या सालीचा बारीक थर राहिला असल्यास चोळून बाजूला काढा.

२) लसणाचा कांदा मोकळा करून घ्या. एक तवा गरम करा. यावर थोडे मीठ टाकून घ्या व यावर लसणाच्या मोकळ्या पाकळ्या टाका. १ ते २ मिनिट लसूण परतून घेतल्यावर गॅस बंद करा. अलगद तुम्हाला सालं पटापट वेगळी करता येतील.

हे ही वाचा<< ४८ वर्षीय मलायकाच्या रुटीनमध्ये ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक आहे खास; परफेक्ट बॉडीसाठी ठरू शकतो रामबाण उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला माहित आहे का? एम्स रुग्णालयाचे माजी सल्लागार व साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या माहितीनुसार लसणाचे सेवन हे किडनीचे विकार दूर करण्यात फायदेशीर ठरू शकते तसेच यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढू शकते. त्यामुळे रोजच्या जेवणात तुमच्या आरोग्याची काळजी घेत लसणाचे सेवन आवर्जून करता येईल. तुमच्याकडेही लसूण सोलण्याचे असे काही सोपे हॅक असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा.