चुकीचा आहार, बिघडलेली जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे असे जुनाट आजार आहेत ज्यांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेह आणि रक्तदाबामुळे यावर नियंत्रण न ठेवल्यास हृदय, किडनी आणि फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बदलल्यास हा आजार सहज नियंत्रणात ठेवता येतो. चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून ते कोणत्या टिप्स आहेत ज्यांचा अवलंब करून मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित करू शकतात.

दिवसाची सुरुवात नाश्त्याने करा

जर तुम्हाला मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर नाश्ता वगळू नका. सकाळचा सकस नाश्ता रक्तदाब आणि साखरेच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरतो.तज्ज्ञांच्या मते, सकाळी लवकर हेल्दी ब्रेकफास्ट केल्याने रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित राहते. सकाळचा पौष्टिक नाश्ता घेतल्यास शरीर दिवसभर निरोगी राहते. साधी जीवनशैली आणि आहाराच्या सवयी रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात प्रभावी ठरतात.

पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर समृध्द पदार्थांचे सेवन सकाळी करा

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, आहारात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असलेले पदार्थ खा. डार्क चॉकलेट हे मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे, त्याचे सेवन करा. सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, त्यांचे सेवन करा. चिया आणि भोपळ्याच्या बिया, बेरी, टोमॅटो, ब्रोकोली आणि केळी यांचे सेवन करा, शरीरातील पोटॅशियमची कमतरता पूर्ण होईल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील.

( हे ही वाचा: Republic Day 2023: २६ जानेवारीला पंतप्रधान तिरंगा का फडकवत नाहीत? जाणून घ्या कारण)

निरोगी जीवनशैली ठेवा आणि तणावापासून दूर राहा

जर तुम्हाला तुमचा बीपी आणि साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि तणावापासून दूर राहा. तणाव हे सर्व रोगांचे मूळ आहे, त्यामुळे तणावापासून दूर राहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेडिटेशन करा

जर तुम्हाला रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर सकाळी लवकर मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते, तणाव दूर होतो आणि बीपी आणि शुगरसारखे आजारही नियंत्रणात राहतात. या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही दररोज रक्तदाब आणि साखर नियंत्रित करू शकता आणि सामान्य जीवन जगू शकता.