मुलींमध्ये सध्या झिरो फिगरची क्रेझ आहे. प्रत्येक तरुणी किंवा महिला आरोग्याबाबत सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करणे, व्यायाम करणे यांसारखे प्रकार तरुणी करताना दिसतात. मात्र व्यायामाबरोबरच योग्य आहार घेतला तर या समस्या दूर होऊ शकतात. अनेक तरुणी वजन वाढल्यामुळे त्रस्त असतात. वजन वाढल्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही होतो. व्यायाम केल्यामुळे शरीरावरील चरबी कमी करता येऊ शकते. त्याचप्रमाणे चेह-यावरील चरबीही ठराविक व्यायाम आणि योग्य आहारामुळे कमी करता येऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही जिममध्ये वैगरे जाण्याची आवश्यकताही नाही.

चेह-यावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे काही वेळा चेहरा बेढब दिसायला लागतो. अनेकवेळा आपला चेहरा असा आहे याटा न्यूनगंड वाटल्याने व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी योग्य आहार आणि चेह-याचे ठराविक व्यायाम करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळे उपचार घेऊन चेह-याला नुकसान पोहोचवण्यापेक्षा काही घरगुती उपायांमुळे गळा, मान, गाल यांच्यावरील अतिरिक्त चरबी कमी करता येते. पाहूयात रुपम सिन्हा यांनी सांगितलेले घरगुती उपाय….

१. अंडी – अंड्यामध्ये प्रोटीन आणि अॅल्बुमिन असते. याच्या सेवनामुळे त्वचेचा पोत सुधारतो. तसेच गालावरील चरबी कमी करण्यास हे घटक मदत करतात. त्यासाठी २ अंडी, १चमचा दूध,१ चमचा लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण चेहरा आणि मानेवर अर्ध्या तासासाठी लावावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

२. ग्लिसरीन – ग्लिसरीन त्वचेमध्ये ओलावा निर्माण करुन त्वचा मऊ ठेवण्याचे काम करते. यामध्ये असलेले घटक त्वचेवरील अतिरिक्त फॅट्स कमी करतात. त्यासाठी १ चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा मीठ याचे मिश्रण कापसाच्या बोळ्याने चेहरा आणि मानेवर लावावे. २० मिनीटांनी हा लेप धुवून टाकावा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा प्रयोग केल्यास नक्कीच फरक जाणवतो.

३. दूध – दूधामध्ये अनेक पोषकद्रव्य असून दूधामुळे चेह-याचा रंग उजळण्यास मदत होते. चेह-यावर दूधाचा वापर केल्यास चेह-यावरील सुरकुत्यादेखील कमी होतात. यासाठी १ चमचा दूध आणि १ चमचा मध हा पॅक अतिरिक्त चरबी असलेल्या भागावर लावून मसाज करावा. यानंतर १० मिनीटांनी पॅक धुवावा. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग करावा.

४. हळद – हळदीमध्ये अॅटी-बॅक्टेरिअल आणि अॅटीएजिंग गुण असतात. यामुळे त्वचेवरील सूज कमी करण्यास मदत होते. १ चमचा हळद, १ चमचा दही आणि एक चमचा बेसन यांचे मिश्रण करुन ते लावावे. त्यानंतर २० मिनीटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेह-यावरील चरबी कमी होऊन रंग उजळण्यास मदत होते.

चेह-यावरील चरबी कमी करण्यासाठी बाह्य उपायांबरोबरच शरीरांतर्गत उपाय करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी आपल्या काही सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता असते.

१. पाणी पिणे – शरीरात पाणी कमी पडल्यामुळे गालावर सूज येऊ शकते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कायम समान ठेवावी. त्यासाठी दिवसातून कमीत कमी ८ ते ९ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

२. मीठ आणि साखरेचे प्रमाण योग्य असावे – कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे वाईटच. त्यामुळे आपला आहारही योग्य प्रमाणात असावा. यासाठी जेवणात मीठ आणि साखर यांचे प्रमाण योग्य असावे.

३. मद्यपान टाळा – मद्यपान केल्यामुळे शरीराबरोबरच चेह-यावर सूज येते त्यामुळे मद्यपान करणे टाळावे. मद्यपानामुळे अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळत असल्याने ते टाळलेलेच बरे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. आहारात फळे, भाज्यांचा समावेश करा – फळे आणि भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी असते. त्याचप्रमाणे त्यात फायबरचे प्रमाणही मुबलक असते. त्यामुळे आहारात भाज्यांचा तसेच फळांचा जास्तीत जास्त वापर करावा.