Tips To Remove Bad Smell From Car naturally : सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. या दिवसांत अनेकजण पावसात मस्त फिरण्याचा प्लॅन बनवतात. यात पावसात कारने फिरण्याची एक वेगळी मज्जा असते. पण अनेकदा पावसात कारने फिरताना ओलाव्यामुळे कारच्या एसीमधून कुबट, घाणेरडा वास येतो. जो अनेकदा डोकेदुखीचे कारण ठरतो. कित्येक दिवस कारमध्ये हा वास राहतो, अशावेळी कारमधील घाणेरडा वास घालवण्यासाठी काय करावे सुचत नाही. पण आता काळजी करु नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही कारमधील दुर्गंधी, घाणेरडा वास काही मिनिटांत घालवू शकता.
कारमधील एसीची हवा ताजी ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
१) केबिन एअर फिल्टर स्वच्छ करा
तुमच्या कारच्या एसीमधून घाणेरडा वास येण्याचे एक प्रमुख कारण केबिन एअर फिल्टर असू शकते. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे त्यात घाण आणि बुरशी जमा होते त्यामुळे घाण वास येतो. म्हणून एसी केबिन एअर फिल्टर स्वच्छ आहे की नाही ते तपासा, जर त्यात घाण जमा झाली असेल तरी ती लगेच स्वच्छ करा किंवा फिल्टर बदला.
२) एसी व्हेंट स्वच्छ करा
कारच्या एसीमधून घाणेरडा वास येण्यामागे आणखी एक कारण म्हणजे एसी व्हेंटमध्ये घाण जमा होणे. यासाठी एसी व्हेंट नेहमी मऊ ब्रश किंवा कापडाच्या मदतीने पूर्णपणे स्वच्छ करा. तुम्ही एसी व्हेंट क्लिनर किंवा डिसइंफेक्टेंट स्प्रेच्या मदतीने देखील तो स्वच्छ करू शकता.
३) कारमध्ये ब्लोअरचा वापर करा
पावसाळ्यात कारमध्ये आर्द्रता वाढते, अशा परिस्थितीत एसी बंद करा आणि ब्लोअर २-३ मिनिटे चालू करा. असे केल्याने एसी युनिटमध्ये बुरशी तयार होण्याची समस्या कमी होते आणि दुर्गंधी येण्याची शक्यता कमी होते.
४) कार स्वच्छ ठेवा
कारमधून उतरवण्यापूर्वी त्यामधील सर्व कचरा व्यवस्थित स्वच्छ करा. चहा- कॉफीचे कप, चिप्स अथवा इतर खाद्यपदार्थांची पाकिटं, सिगारेट किंवा इतर तस्यम पदार्थांचे रॅपर कारमधून जमा करुन फेकून द्या. कारण या सर्व गोष्टींमुळे कारमध्ये दुर्गंधी येते. कारचे इंटिरिअर नेहमी स्वच्छ ठेवा. कारच्या सीट्सवर बेकिंग सोडा शिंपडा.