अनेकवेळा आपल्या आवडत्या कपड्यांवर जेवण बनवताना किंवा जेवताना चुकून डाग पडतात आणि त्यामुळे ते डाग काढण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. त्यात जर हळदीचा डाग पडला, तर तो लवकर निघत नाही. त्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. पण तरीही काहीवेळा असे चिकट डाग निघत नाहीत. त्यात जर कपड्यांचा रंग फिकट असेल तर तो ड्रेसवर उठून दिसतो, त्यामुळे अशा डाग पडलेल्या कपड्यांचा त्याग करावा लागतो. असे चिकट डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

हळदीसारखे सहज न निघणारे डाग घालवण्यासाठी वापरा या टिप्स :

लिंबू
जर एखाद्या कार्यक्रमात असताना तुमच्या कपड्यांवर जेवताना काही डाग पडला, तर अशावेळी डिटर्जंट किंवा साबण मिळणे कठीण असते. अशा डागापासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरू शकते. कपड्यावर जिथे डाग पडला आहे त्यावर लिंबू चोळा, त्यावर थोडे लिंबाचे थेंब टाकून नंतर ते कापड पाण्याने धुवून टाका, यामुळे डागापासून सुटका मिळेल.

थंड पाणी
जर पांढऱ्या किंवा फिकट कपड्यांवर हळदीचा डाग पडला तर लगेच ते कापड थंड पाण्यात भिजवून नंतर डिटर्जंटने धुवून टाका. थंड पाण्यामुळे डाग निघण्यास मदत होते.

Winter Fruits : हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी मदत करतात ‘ही’ फळं; लगेच करा डाएटमध्ये समावेश

टूथपेस्ट
टूथपेस्ट देखील कपड्यांवरील डाग काढण्यास फायदेशीर ठरते हे अनेकजणांना माहीत नसते. ज्या भागावर डाग पडला आहे तिथे टूथपेस्टने चोळून थोड्या वेळासाठी तसेच सुकू द्या, त्यानंतर पाण्याने धुवून टाका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिनेगर
काही खाद्यपदार्थ अधिक स्वादिष्ट करण्यासाठी त्यात व्हिनेगर वापरले जाते. यासह डागांपासून सुटका मिळवण्यासाठीही व्हिनेगर फायदेशीर मानले जाते. यासाठी लिक्विड शॉप मध्ये थोडे व्हिनेगर मिसळून, ते डाग लागलेल्या जागी अर्ध्या तासासाठी लावून ठेवा, त्यानंतर कापड पाण्याने धुवून टाका.