Right Way To Store Dry Fruit : सुका मेवा (Dry Fruit) हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. चवीसोबतच ते अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. पण अनेकदा लोकांना ते व्यवस्थित साठवता येत नाही, त्यामुळे ते वेळेआधीच खराब होतात. अनेक वेळा आपण बदाम, बेदाणे, काजू इत्यादी ड्राय फ्रुट्स किंवा सुका मेवा मोठ्या प्रमाणात खरेदी करतो कारण ते मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यावर स्वस्त असतात. परंतु मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या सुक्या मेव्याची योग्य प्रकारे साठवणूक न करणे अडचणीचे ठरू शकते. जर ते व्यवस्थित साठवले गेले नाहीत तर ते लवकर खराब होऊ शकतात. काही सोप्या टिप्स फॉलो करून सुका मेवा वर्षानुवर्षे ताजे आणि कुरकुरीत ठेवता येतात हे तुम्हाला माहीत आहे का? चला तुम्हाला सुका मेवा व्यवस्थित साठवण्याच्या 5 पद्धती सांगूया…
हवाबंद डबा
सुका मेवा दीर्घकाळ ताजे ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यांना हवाबंद डब्यात साठवून ठेवणे.अशा डब्यात सुका मेवा ठेवल्याने त्यातील आर्द्रता टिकून राहते आणि ते खराब होण्याची शक्यता कमी होते. प्लॅस्टिकचे हवाबंद डबे सहज उपलब्ध होतात आणि ते घट्ट बंद करता येतात. सर्व प्रकारच्या सुक्या मेव्यासाठी स्वतंत्र डब्बा वापरा. सुका मेवा हवाबंद डब्यात ठेवून अनेक महिने ताजे ठेवता येते.
कोरड्या जागी ठेवा
सुका मेवा कोरड्या जागी ठेवणे फार महत्वाचे आहे. ओलाव्यामुळे सुक्या मेव्यांचा ताजेपणा नष्ट होतो आणि ते खराब होतात. म्हणून, स्वयंपाकघरात पाणी किंवा ओलावा पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी सुका मेवा ठेवा. त्यांना कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. त्यांना उंच ठिकाणी किंवा कपाटावर ठेवणे योग्य असेल.
हेही वाचा- माठातील पाणी पिण्याचे आरोग्यासाठी होणारे ५ फायदे, जाणून घ्या
जास्त गरम ठिकाणी ठेवणे टाळा
थेट सूर्यप्रकाशात किंवा स्वयंपाकघरासारख्या गरम तापमान असलेल्या ठिकाणी सुका मेवा ठेवू नका.
फ्रीजमध्ये ठेवा
जर तुम्हाला तुमचे सुका मेवा जास्त काळ साठवायचे असतील तर तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.
बायोडिग्रेडेबल सिलिका जेल पॅकेट्स
सुका मेवा अशा पॅकेटमध्ये टाकून तुम्ही त्याचा ताजेपणा टिकवून ठेवू शकता, कारण ते ओलावा स्वतःच शोषून घेते.
नियमितपणे तपासा
सुका मेवा दर काही आठवड्यांनी एकदा तपासा की त्यात कीड लागली नाही न