How To Calm Vata Cool Pitta And Reduce Kapha Naturally : आयुर्वेदातील सर्वात प्रसिद्ध फळांपैकी एक म्हणजे आवळा आहे. आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष मुलभूत मानले जातात. हो दोष सामान्यत: माणसाच्या शरीरात असतात. त्यावरून त्या माणसाची आरोग्य प्रकृती निश्चित होते. याला आयुर्वेदाच्या परिभाषेत त्रिदोष असे संबोधले जाते. तर शरीरातील तिन्ही दोष संतुलन करण्यास आवळा मदत करते असे मानले जाते. कारण – आवळ्यामधे उच्च व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि विविध पोषक तत्व आहेत.
पावडर, रस, मुरब्बा अशाप्रकारे आवळ्याचे तुम्ही नैसर्गिक, कच्च्या किंवा सौम्य पद्धतीने सेवन केलं तर पित्त शांत करण्यास, अनियमित वात शांत होण्यास आणि कफ दूर करण्याचे मार्ग प्रदान करतो. आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र या दोघांच्या मते आवळा फक्त फळ नसून आरोग्य जपण्याची एक उपाय आहे.
तर आवळा तुम्हाला कशी मदत करतो ?
आयुर्वेदानुसार शरीरात तीन प्रकारच्या ऊर्जा असतात.
१. वात (हवा व हालचाल )
२. पित्त (उष्णता, परिवर्तन वा बदल ) आणि
३. कफ (रचना, स्थिरता)
त्यामुळे यापैकी कुठल्याही ऊर्जेत असंतुलन झाले की, शारीरिक किंवा मानसिक समस्या निर्माण होऊ शकतातत्याचप्रमाणे आवळा या तिन्ही दोषांवर परिणाम करतो. आवळा वात शांत करून कोरडेपणा व अस्थिरता कमी करतो, पित्तामुळे होणारी जळजळ कमी करतो आणि शरीराला थंडावा देतो. त्याचप्रमाणे कफामुळे होणारा कोरडेपणा कमी करतो आणि मन शांत ठेवतो.
तर राहिला प्रश्न तर दैनंदिन जीवनात आवळा कसा समाविष्ट करायचा?
- सकाळी ताज्या आवळ्याचा रस पाण्यात मिसळून प्या.
- आवळ्याची पावडर कोमट पाण्यात, स्मूदीमध्ये किंवा हर्बल टीमध्ये मिसळून सेवनकरा .
- कच्चा आवळा, मुरंबा किंवा त्याची चटणी बनवून खा.
- केसांच्या तेल म्हणून आणि त्वचेच्या उपचारांमध्ये आवळा वापरा. कारण त्याचे अँटीऑक्सिडंट परिणाम त्वचेला आणि केसांना फायदेशीर ठरतात.
काय काळजी घ्यावी?
- ज्यांना पचनाशी संबंधित संवेदनशीलता आहे किंवा ज्यांचा कफ किंवा खोकला जास्त वाढला आहे त्यांनी आवळ्याचे सेवन करताना कमी प्रमाणात सुरुवात करावी.
- जर तुम्हाला हायपोक्लोरहायड्रिया किंवा पेप्टिक अल्सरची समस्या असेल तर आवळ्याचा आंबटपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. त्यामुळे जपून किंवा प्रमाणात सेवन करावे.
- इतर औषधांबरोबर (विशेषतः मधुमेह किंवा यकृताच्या आजारांबरोबर ) आवळा पूरक आहार घेण्यापूर्वी तुमच्या आरोग्यसेवा किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या; जेणेकरून उद्भवणाऱ्या समस्या टाळता येईल.