How To Use Camphor: हिंदू धर्मात कापूरला खूप शुभ मानले जाते. प्रत्येक पूजा कार्यात कापूर प्रामुख्याने वापरला जातो. कापुराचा वापर अनेक दैनंदिन कामातही केला जाऊ शकते. कापूराचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. कापूरच्या वापराने तुमच्या जीवनशैलीशी संबंधित समस्याही दूर होऊ शकतात. म्हणजेच बाजारात पाच रुपयांना मिळणाऱ्या या कापूरचे इतके फायदे आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

कापूरचा अनेकांना फायदा होतो

कापूर हे असे रसायन आहे, जे एका खास वनस्पतीपासून मिळते. कापूर साधारणपणे तीन प्रकारचा असतो, पहिला जपानी, दुसरा भीमसेनी आणि तिसरा पत्री कपूर. कापूर पूजेसाठी, औषधासाठी आणि सुगंधासाठी वापरला जातो. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ही खूप उपयुक्त गोष्ट मानली जाते. कापूरच्या सुगंधाने मन एकाग्र होते. ज्यामध्ये त्याची आग कफ आणि वात नष्ट करते.

औषध म्हणून कसे वापरावे?

कापूर तेल त्वचेमध्ये रक्त परिसंचरण सुलभ करते. हे जळजळ, पुरळ आणि तेलकट त्वचेच्या उपचारांमध्ये वापरले जाते. संधिवात वेदना कमी करण्यासाठी कापूर मिश्रित मलम वापरला जातो. मानदुखीवर कापूरयुक्त बाम लावल्याने आराम मिळतो. कफामुळे छातीत जड होण्यावर कापूर तेल चोळल्यास आराम मिळतो.

( हे ही वाचा: केवळ दुधातच नाही तर ‘या’ १० गोष्टींमध्येही असते भरपूर कॅल्शियम; आजच करा आहारात समावेश)

अगणित फायदे जाणून थक्क व्हाल

त्वचेच्या संसर्गासाठी म्हणजेच त्वचेची खाज आणि जळजळ यासाठी एक चमचा कापूर एक कप खोबरेल तेलात मिसळा. तसंच भेगा पडलेल्या टाचांवर कापूर हा उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात कापूर मिसळा आणि त्या पाण्यात पाय ठेवून बसा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे करा, भेगा भरू लागतील.

सर्दी झाल्यास गरम पाण्यात कापूर टाकून त्याची वाफ घेतल्याने खूप आराम मिळतो. खोकला झाल्यास मोहरी किंवा तिळाच्या तेलात कापूर मिसळून पाठ आणि छातीची मालिश केल्यास आराम मिळतो. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास, शुंथी, अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन कापूरसोबत बारीक करून पेस्ट बनवा. लक्षात ठेवा की या सर्व गोष्टींचे प्रमाण समान असावे. ही पेस्ट कपाळावर लावल्याने डोकेदुखीमध्ये खूप आराम मिळतो.

केसांसाठीही कापूर फायदेशीर आहे. वाढते प्रदूषण आणि खराब पाण्याच्या वापरामुळे लोकांमध्ये केस गळण्याची समस्या वाढत आहे. याशिवाय कोंड्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांना लावल्यास त्यांना खूप फायदा होतो.

( हे ही वाचा: स्वयंपाकघरात असलेल्या ‘या’ ४ आयुर्वेदिक गोष्टींमुळे मधुमेह सुरू होण्यापूर्वीच थांबतो, रक्तातील साखरही वाढत नाही!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरी कापूर कसा वापरायचा

कपडे चांगले ठेवण्यासाठी, आपण त्यामध्ये नॅप्थालीन गोळ्या टाकतो, या ऐवजी तुम्ही कापूर देखील वापरू शकता. यामुळे कपडे ताजे राहतील आणि त्यामध्ये किडे येणार नाहीत. कापूर बारीक करून घ्या, त्यानंतर त्या पावडरमध्ये दोन चमचे लॅव्हेंडर तेल मिसळा आणि स्प्रे बाटलीत टाका आणि घरात शिंपडा, यामुळे घर सुगंधित होईल. हे एक उत्कृष्ट रूम फ्रेशनर म्हणून काम करेल. म्हणजे कापूर तुमच्या घराला सुगंधित करेल आणि त्याची नकारात्मक ऊर्जा देखील दूर करेल.