How to wash dishes in winter : भांडी धुणे आणि स्वयंपाक करणे हे सर्वात कठीण काम आहे. थंडीच्या ऋतुमध्ये भांडी धुताना आणखी त्रास होतो. जसजसा हिवाळा वाढत जातो तसतसे टाकीतील पाणी आणखी थंड होते. कधी कधी पाणी इतके थंड असते की, भांडी धुण्याची अजिबात इच्छा होत नाही.

हिवाळ्यात भांडी कशी धुवायची?

घरातील महिलांना थंडीच्या काळात अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा भांड्यांचे ढीग पडलेले असताना एवढ्या थंडीत भांडी कशी धुतली जातील या विचाराने हात थरथरू लागतात. अशा परिस्थितीत तुम्हाला हिवाळ्यात भांडी धुण्याच्या सोप्या टिप्सबद्दल सांगणार आहोत. या युक्तीचा अवलंब करून तुम्ही तुमची भांडी सहज धुवू शकता.

हेही वाचा – तब्बल ९० हजारांचे बिल पाहून संतापला ग्राहक! रागाच्या भरात हातोड्याने फोडली ओला इलेक्ट्रिक स्कूटर, Video Viral

हिवाळ्यात भांडी सहज कशी स्वच्छ करावीत?

हिवाळ्यात भांडी धुण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. तुम्ही पाणी गरम करण्यासाठी गॅस स्टोव्ह वापरू शकता किंवा तुमच्या घरात गीझर लावला असेल तर तिथून पाणी घेऊन त्यात कोमट पाणी मिसळून भांडी सहज धुता येतील. भांडी गरम पाण्याने धुतल्याने तेल असलेली भांडीही सहज स्वच्छ होतील

हेही वाचा – संत्री आहे हिवाळ्यातील सुपरफूड! रोज ‘या’ वेळी एक संत्रे खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे

भांडे एक तास आधी गरम पाण्यात भिजवावे

भांडी साफ करण्यापूर्वी ते गरम पाण्यात भिजवावे. भांडी गरम पाण्यात भिजवताना, पाण्यात सौम्य डिशवॉशिंग लिक्विड, बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर घाला. लक्षात ठेवा की भांडे पूर्णपणे पाण्यात भिजलेले असावे. यामुळे भांड्यांचा तेलकटपणा आणि डाग मऊ होतील, ज्यामुळे ते धुणे सोपे होईल. भांडी गरम पाण्यात भिजवल्याने थंड होत नाही आणि सहज धुता येतात

हेही वाचा– घरच्या घरी तूप तयार करताना साय कशी साठवावी? या टिप्स वापरल्यास येणार नाही दुर्गंध, महिनाभर ताजी राहिल साय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिवाळ्यात सिलिकॉनचे हातमोजे वापरा

हिवाळ्यात भांडी धुण्यासाठी सिलिकॉनचेहातमोजे घालणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. याने भांडी धुणे खूप सोपे आहे आणि याच्या वापराने हातांना थंडी जाणवत नाही. हे हातमोजे इतके चांगले आहेत की भांड्यांना स्पर्श करूनही ते लवकर खराब होत नाहीत. तुम्ही ते बाजारातून सहज खरेदी करू शकता