अनेक जणांना हाताच्या आणि पायाच्या नसांमध्ये वेदना जाणवतात. परंतु यामागचे कारण काय आहे हे बऱ्याच जणांना माहित नसते. नसा दुखणे हे नसा कमकुवत झाल्याचे लक्षण असते. यावर बाहेरून वेगवेगळी औषध लावून बरे करण्याचा प्रयत्न केला जातो. पण नसा कमकुवत झाल्या असतील तर उत्तम आहाराद्वारे, नसा पुन्हा निरोगी करता येऊ शकतात. तसेच काही फळ्यांच्या सेवनाने नसांमध्ये वेदना होण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी कोणती फळं खावी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संत्री
संत्र्यांमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी असते. जे नसा निरोगी करण्यासाठी चांगले मानले जाते. तसेच ‘व्हिटॅमिन सी’मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

Health Tips : गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या

बेरीज
ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीमधील अनेक अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. जे नसा निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्सही आढळतात

एवोकॅडो
एवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट्ससह मुबलक प्रमाणात पोटॅशिअम आढळते. त्यामुळे हे फळ खाल्ल्याने शरीरातील नसा निरोगी राहण्यास मदत होते.

सफरचंद
सफरचंदामध्ये भरपुर फायबर आढळते. सफरचंद खाल्ल्याने नसांमधील वेदना कमी होण्यास मदत मिळते. काही वेळा बद्धकोष्ठतेमुळे नसांवर दाब पडतो आणि त्याच्याशी निगडित समस्या उद्भवते. यावरदेखील सफरचंद उपयुक्त मानण्यात आले आहे.

लिंबू

संत्र्याप्रमाणे लिंबामध्ये देखील भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. तसेच लिंबामध्ये अँटी इन्फलामेंटरी आणि अँटि ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे नसा निरोगी राहण्यास आणि जर नसांमध्ये वेदना जाणवत असतील तर त्या कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही लिंबू पाणी किंवा भाज्यांमध्ये लिंबू पिळून घेऊ शकता.

Body Pain Causes : तुम्हाला सतत अंगदुखी जाणवते का? जाणून घ्या यामागचे कारण

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are having nerve pain regularly then include these five fruits in your diet pns
First published on: 11-09-2022 at 15:49 IST