Yoga Asanas for Acidity : चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. जेवणाच्या आणि झोपण्याच्या अनियमित वेळांमुळे अपचन किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास उद्भवतो.अ‍ॅसिडिटीमध्ये छातीत जळजळ निर्माण होते आणि पचनक्रिया बिघडते ज्याचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो.अ‍ॅसिडिटी झाल्यानंतर आपण अनेकदा घरगुती उपाय किंवा अति त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जातो पण तुम्हाला वारंवार अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही दैनंदिन जीवनात काही योगासने नियमित केली पाहिजे.

यासंदर्भआत योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी यांनी नेहमी अ‍ॅसिडिटीचा त्रास होणाऱ्या लोकांसाठी तीन योगासने करून दाखवली आहेत. ती तीन योगासने खालीलप्रमाणे :

१. वज्रासन – जेवल्यानंतर पाच मिनिटे वज्रासनमध्ये बसा.
२.पवनमुक्तासन – उपाशीपोटी ३० ते ६० सेकंद पवनमुक्तासन करा.
३.अर्ध मत्स्येंद्रासन – उपाशीपोटी ३० ते ६० सेकंद अर्ध मत्स्येंद्रासन करा.

मृणालिनी यांनी त्यांच्या yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अ‍ॅसिडिटी हा असा त्रास आहे जो आपला पूर्ण दिवस खराब करू शकतो.

हेही वाचा : Dark chocolate : तुम्हाला डार्क चॉकलेट खायला आवडते? पण ते आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात….

वज्रासन –

नियमित सरावाने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. पचनसंस्था चांगली राहिल्याने अल्सर आणि अॅसिडिटी सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. 5 मिनिटे या स्थितीमध्ये राहा.

पवनमुक्तासन –

हे आसन दररोज केल्याने पचनक्षमता तर सुधारतेच शिवाय, पोटातील गॅसेसची समस्या ही दूर होते
30 ते 60 सेकंद या स्थितीमध्ये राहा.

अर्ध मत्स्येंद्रासन –

शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि पचनक्रिया मजबूत होते. हे आसन केल्याने अन्न सहज पचते आणि शरीरात बद्धकोष्ठता किंवा जडपणाचा त्रास होत नाही. 30 ते 60 सेकंद या स्थितीमध्ये राहा.”

मृणालिनी कॅप्शनमध्ये पुढे लिहितात,

  • क्षमतेपेक्षा जास्त जेवण टाळा.
  • जास्त प्रमाणात तेलकट-तिखट खाणं टाळा.
  • अतिप्रमाणात किंव जेवणानंतर चहा-कॉफी पिणं टाळा.
  • जेवल्यानंतर लगेच झोपू नका.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “अतिशय उपयुक्त, उत्तम” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान, तुम्ही खूप चांगले काम करत आहात.” काही युजर्सनी प्रश्न सुद्धा विचारले आहेत.