How can I get rid of lizards fast: पाल म्हटलं की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. अनेकदा घरातील भिंती, बाथरूम किंवा स्वयंपाकघर येथे पालींचा वावर दिसून येतो. स्वयंपाकघरात पाल फिरताना दिसली की, जेवण बनवितानाही खूप काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत पालींना घरातून पळविण्यासाठी काही जण बाजारातील हानिकारक रसायनांचा वापर करतात. परंतु, तुम्ही घरातून पालीला पळवून लावण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही सोप्या घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकता.
पालीला पळवून लावण्यासाठी घरगुती टिप्स
कांदा-लसूण स्प्रे वापरा
पालीला पळविण्यासाठी तुम्ही एका स्प्रे बाटलीत कांदा आणि लसूण रस भरा. आता त्यात थोडे पाणी घाला. मग पाणी आणि रस व्यवस्थित एकजीव होण्यासाठी बाटली चांगली हलवून घ्या.
मिरपूड स्प्रे फवारा
पाल मुख्यतः घरांच्या छतावर किंवा भिंतीवर आढळते. अशा वेळी आपण छतावर अंड्याचे कवच ठेवू शकत नाही. मगा अशा परिस्थितीत तुम्ही मिरपूड स्प्रेची मदत घेऊ शकता. त्यासाठी एका स्प्रे बाटलीत पाणी भरून, त्यात काळ्या मिरीची तयार पावडर वा काळी मिरी पावडर करून टाका. छतावर कुठेही पाल फिरताना दिसली की, लगेच हा स्प्रे तिच्या अंगावर फवारा, ज्यामुळे ती घरातून पळून जाईल.
अंड्याचे कवच ठेवा
अंड्याचे कवच पालीला पळविण्यास मदत करू शकतात. पाल अंड्याच्या कवचापासून दूर पळते. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पाल जास्त दिसते, त्या ठिकाणी हे कवच ठेवा. असे केल्याने तुम्ही पालींच्या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता.
कांदा भिंतीवर लटकवून ठेवा
पालीला पळवण्यासाठी तुम्ही कांद्याचाही वापर करू शकता. त्यासाठी कांदा धाग्याने बांधून, तो भिंतीवर लटकवू शकता. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. त्या उग्र वासामुळे पाली पळून जातात.
नॅप्थॅलीनच्या गोळ्यांचा उपयोग करा
कपड्यांपासून किडे दूर ठेवण्यासाठी आणि पालीला घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही नॅप्थॅलीन गोळ्यांचादेखील वापर करू शकता. या गोळ्या तुम्ही कपाटाच्या वर ठेवू शकता.