Yoga Video : चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर परिणाम होतो. अशात अनेक जण तासन्-तास एकाच जागी बसून काम करतात. दिवसभर बैठं काम करणाऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात पण अशा लोकांनी जर नियमित योगा केला तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. यासंदर्भात योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये मृणालिनी यांनी ८-९ तास बसून काम करणाऱ्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी योगासने सांगितले आहेत. ही योगासने त्या करून दाखवत आहेत. ही योगासने आणि त्यांचे फायदे खालीलप्रमाणे :

१. सेतुबंधासन
पाठ व कंबरदुखीवर आराम मिळेल

20 minute meditation benefits
रात्री झोपण्यापूर्वी २० मिनिट ध्यान करण्याचे फायदे ठाऊक आहेत का?
How to clean burnt cooker bottom
कुकर आतून काळा पडलाय? ‘या’ तीन टिप्सच्या मदतीने…
Is it necessary to use masks to protect pets
पाळीव प्राण्यांना प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
diy Tulsi plant maintain Tips hacks
हिवाळ्यात तुळशीची पानं पिवळी पडून सुकतायत? फॉलो करा फक्त चार टिप्स, तुळस पुन्हा होईल हिरवीगार
women more satisfied then single men study suggests
एकट्या महिला एकट्या पुरुषांपेक्षा जास्त सुखी; नव्या अभ्यासातील निष्कर्ष चर्चेत! वाचा सविस्तर…
liver damage causes | alcohol drinking mans liver health news marathi
आठवड्यातून एक दिवस मद्यप्राशन करणाऱ्यांचे यकृत आतून कसे दिसते? पाहा धक्कादायक फोटो, डॉक्टर म्हणाले…
makeup hacks how long can you wear makeup
Makeup Hacks : चेहऱ्यावर किती तास मेकअप ठेवणे सुरक्षित? त्वचेला हानी पोहोचू नये यासाठी काय करावे? जाणून घ्या
Hair Care Tips for winter Struggling with hair fall in winter? Here's why it happens and haircare tips to stop it
हिवाळ्यात केस गळणे कसे कमी करावे? या ५ टिप्स फॉलो करा; केस राहतील दाट, मुलायम…
Indian Railway timing to book tatkal train ticket in marathi
Indian Railways : ट्रेनचं तात्काळ तिकीट बुकिंग करण्यापूर्वी जरा थांबा! आधी ‘या’ बदललेल्या वेळा एकदा वाचा

२. सुचिरंध्रासन
पाठ व कंबरदुखीवर आराम मिळेल आणि आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होईल.

३.शलभासन
पाठ व कंबरदुखीवर आराम मिळेल आणि आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होईल.

४. अर्धमत्स्येन्द्रासन
पाठ व कंबरदुखीवर आराम मिळेल आणि आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होईल.

हेही वाचा : चहा अन् मैत्री एक वेगळंच नातं! दोन वृद्ध मित्रांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मृणालिनी यांनी yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजकाल बहुतांश लोकांचे काम बैठ्या स्वरूपाचे आहे त्यामुळे सतत ८-९ तास एकाच जागी बसून काम करावं लागतं व खूप वेळ एकाच अवस्थेत बसून राहिल्याने त्याचा वाईट परिणाम पाठीच्या कण्यावर होतो तर, ज्यांना बराच वेळ एका जागेवर बसून काम करावं लागतं अशा सगळ्यांसाठीच ही योगासने अतिशय उपयुक्त ठरणारी आहेत”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “छान” तर एका युजरने लिहिलेय, “या रिलमधील आसनांमुळे मला खूप फायदा मिळाला. पाठदुखी खूप कमी झाली आहे.” काही युजर्सनी प्रश्न सुद्धा विचारले आहेत.

Story img Loader