बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या आहार आणि खाण्याच्या सवयींवर स्पष्टपणे दिसून येतो. हिवाळ्यात आपण गरम अन्न खाण्याचा आग्रह धरतो, तिथे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थांचा आपण सेवन करत असतो. तसेच उन्हाळाच्या दिवसात आपल्याला फारसे जेवण देखील जात नाही तरी देखील वजन वाढत असते. तर बदलत्या ऋतूमध्ये खाण्यापिण्याच्या या बदलाचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
वजन कमी करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच कमी कॅलरी असलेल्या आहारामुळे काही दिवसातच तुमचे वजन कमी होऊ शकते. अशा अनेक फळे आणि भाज्यांचा कमी कॅलरी अन्नापदार्थांच्या डाएट प्लानमध्ये समावेश केला जाऊ शकतो, ज्यामुळे आपली भूक सहज शमवता येते तसेच वजन नियंत्रित करता येते.
तर उन्हाळाच्या दिवसात तुम्ही आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करा ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते उन्हाळ्यात आपले वजनही नियंत्रित करू शकतात. तर दुसरीकडे कर्बोदके असलेले पदार्थ खाणे टाळावेत. कारण अशा अन्नाचे सेवन केल्याने जास्त खाण्याकडे वळत असतो, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तसेच उन्हाळाच्या दिवसात तुम्ही या पेयांचा सेवन करू नका, याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती पेयं…
कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळा
उन्हाळ्यात आपण अनेकदा आपली तहान भागवण्यासाठी थंड पेय घेतो. पण तुम्हाला माहित आहे की कोल्ड ड्रिंक्स वजन वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. कोल्ड्रिंक्समध्ये जास्त कॅलरीज असतात, जे शरीरातील फॅट वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
आईस्क्रीम आणि कस्टर्ड वजन वाढवू शकतात
उन्हाळ्यात आपण अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम आणि कस्टर्ड खातो, ज्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. हे उच्च-कॅलरी पदार्थ तुमचे वजन वाढवू शकतात, त्यामुळे आहारात हे पदार्थ खाणे टाळा.
ही पेय वजन वाढवू शकतात
उन्हाळ्यात आपण बर्याचदा अन्नाकडे कमी लक्ष देतो आणि अधिक पेयं पिण्याकडे वळतो. त्यातच आपण बाहेर गेल्यावर शेकसारखे पेय घेतो. कारण हे पेय प्यायल्याने अनेकदा पोट भरल्यासारखे वाटते तसेच शरीरालाही थंडावा मिळतो. पण तुम्हाला माहित आहे की एका ग्लास शेकमध्ये ३०० ते ५०० कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचे वजन वेगाने वाढते. उन्हाळ्यात अतिरिक्त कॅलरीजचे सेवन वजन वाढवण्यास प्रभावी ठरते.