चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. चेहऱ्याचा महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे तुमचे ओठ. सुंदर ओठांसाठी तुम्हाला काही चांगल्या सवयी असायला हव्यात. ओठ काळे का पडतात असा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावतो. पण त्याचीही अनेक कारणे आहेत. ही कारणे काही नैसर्गिक आहेत तर काही आपण स्वतःहून ओढवून घेतलेली आहेत. सहसा हा बदल ओठांची काळजी न घेतल्यामुळे देखील होतो. परंतु कधीकधी तुमच्या आरोग्यामधील बदलांमुळे देखील होते. तर आपल्या काही सवयी ओठ काळे होण्याचे कारण बनतात. चला तर मग जाणून घेऊयात तुमचे ओठ काळे होऊ नये म्हणून कोणत्या सहा सवयी बदल्या पाहिजे.

ओठ काळे होण्याची कारणे

मॉइस्चरायझिंगचा अभाव

बरेच लोक त्वचेची काळजी घेतात पण ओठांची योग्य काळजी घेत नाहीत. अशा परिस्थितीत हायड्रेशन आणि पोषणाच्या अभावामुळे तुमचे ओठ कोरडे आणि रंगहीन होऊ लागतात. तर तुम्ही ओठांची योग्य काळजी न घेतल्यामुळे ते काळे होऊ लागतात. त्यामुळे ही सवय बदला आणि तुमच्या ओठांवर क्रीम किंवा लिप बाम लावा.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
thane theft news, jewellery theft thane marathi news
सुट्टी घेतल्यामुळे सेल्समनची चोरी उघड, १ कोटी ५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; नौपाडा पोलिसांनी केली सेल्समनला अटक
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

कमी पाणी पिणे

आपल्या त्वचेत ७०% पाणी असते आणि जेव्हा तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. तेव्हा त्याचा परिणाम ओठांवरही दिसू लागतो. अशा स्थितीत शरीरातील पाणी कमी झाल्याने ओठांची त्वचा हायड्रेशनच्या अभावामुळे काळी आणि कोरडी होऊ लागते. त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्या.

ओठांना एक्‍सफोलिएट न करणे

तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तसेच मृत त्वचा काढण्यासाठी एक्‍सफोलिएट करत असतात. अशातच तुम्ही त्वचेची काळजी घेताना ओठांना देखील एक्‍सफोलिएट करणे महत्वाचे आहे. तुम्ही हे केल नाही तर ओठांवरील मृत त्वचा काढली जात नाही आणि ओठ कोरडे आणि काळे दिसू लागतात.

धूम्रपान न करणे

तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर ते करणे सोडा. कारण तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन आणि बेंझोपायरिन आढळतात, जे तुमच्या शरीराला मेलेनिन तयार करण्यासाठी उत्तेजित करू शकतात आणि यामुळे तुमचे ओठ काळे होऊ शकतात.

ओठांची कमी काळजी घेणे

जेव्हा तुमच्या त्वचेच्या काळजीचा प्रश्न येतो तेव्हा आपण ओठांच्या काळजीकडे तुम्ही दुर्लक्ष करतो. तर कधी कधी ओठांची काळजी घेत नाही. या करिता तुम्ही मॉइस्चरायझिंगपासून एक्सफोलिएशन ओठांसाठी करणे देखील खूप महत्वाचे आहे. अशा स्थितीत तुम्ही जर बदामाच्या तेलाने दररोज मालिश करणे खूप फायदेशीर आहे.

सनब्लॉकचा वापर करत नाही

ओठांची त्वचा अतिशय नाजूक आहे आणि सहजपणे सूर्यप्रकाशित होऊ शकते. अशा परिस्थितीत, आपल्या ओठांना अतिनील किरणांपासून वाचवणे महत्वाचे आहे. तुम्ही लिप बाम लावा. ज्यात SPF 30 आहे. हे तुमचे ओठ गुलाबी ठेवण्यास मदत करेल.