scorecardresearch

Weight Loss : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; पाहा यादी

बेली फॅट म्हणजेच पोटावरील अतिरिक्त चरबीच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. ही चरबी कमी करण्यासाठी कोणते अन्नपदार्थ मदत करतात जाणून घ्या.

Weight Loss : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; पाहा यादी
(Photo : Freepik)

वजन वाढणे ही समस्या आजकाल सर्वांनाच सतावते. बैठी कामाचे स्वरूप, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, पुरेसा व्यायाम न करणे यांमुळे लगेच वजन वाढण्याची शक्यता असते. त्यातच पोटाजवळ पटकन चरबी जमा होते, त्यामुळे बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी जास्त दिसून येते. तरुण मंडळींना देखील बेली फॅटची समस्या सतावत असते. नियमित व्यायाम केल्याने आणि योग्य आहार घेतल्याने पोटावरील अतिरिक्त चरबीची समस्या दूर होऊ शकते.

काही पदार्थ रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास त्यामुळे पोटावरील चरबीचा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी आहारात प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचा समावेश जास्त करावा आणि कार्बोहायड्रेट असणाऱ्या पदार्थांचा समावेश कमी करावा. असे केल्याने काय होते जाणून घ्या.

आणखी वाचा : हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतील ‘या’ गोष्टी; लगेच जाणून घ्या

प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खा
वजन कमी करण्यासाठी प्रोटीन सर्वात महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रिएंट मानले जाते. प्रोटीनमुळे मेटाबॉलिझम बूस्ट होते ज्यामुळे जेवण लगेच पचते. जर तुम्ही नियमितपणे प्रोटीन असणारे पदार्थ खाल्ले तर तुमची ६०% भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.

कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करा
कार्बोहायड्रेटचे सेवन कमी केल्याने कमी भूक लागते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहू शकते. दररोज फक्त ५० ग्राम कार्बोहायड्रेटचे सेवन केल्याने वेगाने वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

आहारामधील फायबरचे प्रमाण वाढवा
वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये फायबर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. फायबरचे सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित काम करते आणि शरीर निरोगी राहते. तसेच यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

Diabetes Diet : योग्य आहार घेतल्याने मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? यावरील तज्ञांचे मत जाणून घ्या

कॅलरीवर लक्ष ठेवा
प्रत्येक खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरी आढळतात. त्यामुळे जर वजन कमी करायचे असेल तर प्रत्येक पदार्थाबरोबर शरीरात किती कॅलरी जात आहेत यावर लक्ष ठेवा.

नियमित व्यायाम करा
निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः जर तुम्हाला पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर तुम्ही त्यासाठीचे व्यायाम तज्ञांच्या मार्गदर्शनाने करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या