मातीची भांडे, ज्याला मटका, माठ किंवा सुरई म्हणूनही ओळखले जाते ते अनेक भारतीय घरांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून वापरले जात आहे. जुन्या काळात, ते पाणी पिण्यासाठी सर्वात पसंतीचे पर्याय होता. तुमच्या कुटुंबातील वडिधाऱ्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील की, त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरात माठ ठेवण्यासाठी एक खास कोपरा कसा राखून ठेवला होता. सध्या काही निवडक लोकच ते वापरत असले तरी बहुतेकांना ते थोडे जुन्या पद्धतीचे वाटते. कारण अनेकांना असा प्रश्न पडतो की, आधीच पसरा असलेल्या स्वयंपाकघरात माठ ठेवायची काय गरज आहे? तुमच्याकडे इतर पर्याय सहज उपलब्ध असताना ते थोडेसे अनावश्यक वाटू शकते. परंतु यामाठातील पाणी पिण्याचे तुमच्या आरोग्यासाठी काही आश्चर्यकारक फायदे आहेत, ज्यामुळे तुम्हाला आता स्वयंपाकघरात ठेवण्याची इच्छा होऊ शकते.

१. थंडावा देते
पाणी साठवण्यासाठी माठ वापरण्याचे प्राथमिक कारण म्हणजे ते नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत करते. ही भांडी सच्छिद्र स्वरूपाची असल्याने, बाष्पीभवन प्रक्रिया जलद होते, परिणामी पाण्यावर नैसर्गिकरित्या थंड प्रभाव पडतो, जो कडक उन्हात तुमची तहान भागवण्यासाठी उत्तम आहे. पोषणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, “मातीच्या भांड्यातून थंड केलेले पाणी पिणे हा थंडगार रेफ्रिजरेटेडमधील पाण्यापेक्षा चांगला पर्याय आहे, कारण नंतरचे आरोग्य समस्या निर्माण करू शकते.”

२. तुमच्या घशासाठी चांगले
जर तुम्ही अशी व्यक्ती असाल ज्याला वारंवार खोकला किंवा सर्दी होत असेल तर माठातील पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आपण सर्वांना रेफ्रिजरेटरचे पाणी पिण्याची सवय करत असते, यामुळे तुमची स्थिती आणखी वाईट होईल. “मातीच्या भांड्याचे पाणी आदर्श तापमान राखते जे घशात जळजळ होऊ देत नाही. ते शांत होण्यास मदत करते आणि भविष्यात असे संक्रमण टाळण्यास मदत करते, असे पोषणतज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा – National Nutrition Week 2023: प्रजननासाठी उपचार घेताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, डॉक्टरांकडून जाणून घ्या…

३. पचनास मदत करते
माठातील पाण्याचे तापमान आदर्श असल्याने ते पचनास मदत करते आणि पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या टाळते. आयुर्वेदानुसार बर्फाचे थंड पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया मंदावते. हे आपल्या पोटातील रक्तवाहिन्या संकुचित करते, ज्यामुळे खूप अस्वस्थता येते. म्हणून, जर तुम्हाला तुमची पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल, तर हे माठातील पाणी पिण्याचा करण्याचा विचार करा.

४. चयापचय वाढवते
आयुर्वेदानुसार, आपल्या शरीराच्या तपमानानुसार पाणी प्यायल्याने पोषक तत्वांचे अधिक चांगले शोषण होते, ज्यामुळे तुमची चयापचय क्रिया वाढते. हे साध्य करण्यासाठी मातीच्या भांड्याचे पाणी आदर्श आहे. दुसरीकडे, जर तुम्ही फ्रिजमधले थंडगार पाणी असेल, तर तुमच्या शरीराला पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, ज्यामुळे तुमची चयापचय मंद होऊ शकते.

हेही वाचा – काजूमध्ये असतात शुन्य कोलेस्ट्रॉल! ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकही टाळू शकतो, डॉक्टरांकडून जाणून घ्या

५. रसायनांचा अभाव
माठ बनवताना कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नाही, ज्यामुळे ते पाणी पिण्यासाठी आणि साठवण्यासाठी चांगले बनू शकते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंजिनियरिंग अप्लाइड सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (IJEAST) द्वारे केलेल्या अभ्यासानुसार, ३० दिवसांच्या कालावधीत माठात साठवलेले पाणी प्लास्टिकच्या बाटल्या आणि स्टीलच्या जगांच्या तुलनेत पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास अधिक सक्षम होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तुम्हाला मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अतुलनीय फायद्यांबद्दल माहिती आहे, तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी माठातील पाणी प्यावे.