केसांचे सौंदर्य जपण्यासाठी अनेक जण धडपड करतात पण सध्या चुकीची लाइफस्टाइल, अयोग्य आहार आणि केसांकडे दुर्लक्ष यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक जण केसगळतीने वैतागले आहेत. यावर अनेक उपाय करूनसुद्धा काहीही फायदा होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला प्राचीन काळापासून केसांच्या आरोग्यासाठी प्रचलित असणाऱ्या योगासनांविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या.

अधोमुख श्वानासन (Downward Facing Pose)

अधोमुख श्वानासन हा योगा आपण सहसा सूर्यनमस्कार करताना करतो. ही पोझ आपल्या केसांच्या वाढीसाठी मदत करते आणि टाळूमधील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करते. असं म्हणतात की केसगळती थांबवण्यासाठी हा योगा दररोज करा.

हेही वाचा : International Yoga Day: ‘या’ तीन योगा पोजिशन प्रजनन क्षमता करू शकतात बूस्ट, पाठदुखीवर रामबाण

सर्वांगासन (Shoulder Stand)

हे योगासन वेगवेगळ्या मसल्स ग्रुपसाठी मदत करते आणि तुमची शरीरयष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर आहे, असे मानले जाते. असं म्हणतात की या योगासनामुळे तुमच्या डोक्यातील ब्लड सर्कुलेशन सुधारते आणि कोरड्या आणि विरळ केसांसाठी हे योगासन अत्यंत फायदेशीर आहे.

शीर्षासन (Headstand)

हे योगासन केसगळती, टक्कल पडणे किंवा केस पातळ होणे इत्यादी केसांच्या समस्या कमी करण्यास मदत करते, असे म्हटले जाते. असं म्हणतात की या योगासनामुळे केस पांढरे होत नाहीत आणि केस वाढतात.

हेही वाचा : Heart Attack : हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणे नव्हे! ही लक्षणेही जाणून घ्या; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… 

उत्तासन (standing forward bend pose)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तासन केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते, असं म्हणतात, उत्तासनामुळे तुमचा थकवा, स्ट्रेस कमी होतो आणि हे योगासन तुमच्या डोक्यात भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करते, ज्यामुळे केसाचे फॉलिकल मजबूत करतात आणि केसगळती कमी होते.