भारतीय रेल्वे वेळोवेळी देशवासीयांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी टूर पॅकेज जाहीर करते. नुकतंच आयआरसीटीसीने चार धाम यात्रेसाठी पॅकेज जाहीर केले आहे. आझादी आणि देखो अपना देश या अमृत महोत्सवांतर्गत हे पॅकेज सादर करण्यात आले आहे. आयआरसीटीसीचे हे चार धाम यात्रा पॅकेज ११ रात्र आणि १२ दिवसांचे आहे ज्यामध्ये तुम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीसह इतर अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. आयआरसीटीसीचे चार धाम यात्रा पॅकेज प्रति प्रवासी रुपये ५८,९०० रुपये आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि यमुनोत्रीचे दर्शन दिले जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार धाम यात्रा १४ मे २०२२ रोजी नागपूर येथून सुरू होणार आहे. येथून प्रवाशांना विमानाने दिल्लीला आणले जाईल. यानंतर दिल्लीहून हरिद्वार, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि बद्रीनाथपर्यंत रस्त्याने जाईल. आयआरसीटीसीच्या या पॅकेजमध्ये निवासासोबतच नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. यासोबतच बस, टॅक्सी, ट्रेन आणि विमानातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा होणार आहे. तसेच सर्व तीर्थक्षेत्रांवर आयआरसीटीसीकडून मार्गदर्शकाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

कसे बुकिंग कराल
आयआरसीटीसीने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट शेअर करून चार धाम यात्रा पॅकेजच्या बुकिंगचे तपशील शेअर केले आहेत, त्यानुसार तुम्ही आयआरसीटीसी वेबसाइटला भेट देऊन या पॅकेजसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकता. याशिवाय, चार धाम यात्रा पॅकेजचे बुकिंग आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील केले जाऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc announce 11 night 12 day package for char dham yatra rmt
First published on: 28-03-2022 at 14:42 IST