महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा मासिक पाळी उशिरा येणे, महिन्यातून दोन वेळा पाळी येणे, ओटीपोटात दुखणे अशी अनेक त्रासाची कारणे आहेत. यामुळे मासिक पाळीत काही महिन्यांचे जरी अंतर पडले आणि खूप त्रास जाणवू लागला तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढत असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. अनियमित मासिक पाळीसंबंधित या संशोधनातून नेमकं काय म्हटले आहे सविस्तर जाणून घेऊ…

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये मे २०२३ प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अनियमित मासिक पाळीमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका वाढत आहे. मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येण्याचा संबंध थेट सीव्हीडी आणि अॅट्रियल फायब्रिलेशनच्या वाढीव जोखमींशी आहे. यामुळे मायोकार्डियल इन्फेक्शन, हार्ट फेल किंवा स्ट्रोक यांसारखे आजार होऊ शकतात; तर मासिक पाळीचे लहान चक्र कोरोनरी हृदयरोग आणि मायोकार्डियल इन्फ्रक्शनच्या मोठ्या जोखमीशी संबंधित आहे.

जगभरात १४ ते २५ टक्के महिला अनियमित मासिक पाळीमुळे त्रस्त

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, जगभरातील १४ ते २५ टक्के महिला अनियमित मासिक पाळीमुळे त्रस्त आहेत. याचा अर्थ अनेक महिलांना ठराविक कालावधीच्या आधीच पाळी येते किंवा खूप उशिरा पाळी येते. याशिवाय अनेक महिने पाळीच येत नाही अशाही काही समस्यांचा सामना महिला करत आहेत. यादरम्यान काहीवेळा खूप जास्त किंवा कमी रक्तस्त्राव होतो. अशा कारणांमुळे ओटीपोटात तीव्र वेदना होणे, कंबरदुखी अशी लक्षणे जाणवतात. अनियमित मासिक पाळीत ॲनोव्ह्यूलेटरी प्रकरणांचादेखील समावेश आहे. यात लठ्ठपणामुळेही महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. लठ्ठपणा आणि अनियमित मासिक पाळी यांचा परस्पर संबंध असून हा सामान्यत: ॲनोव्ह्यूलेटरी सायकलचा परिणाम असतो. यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. सामान्यतः निरोगी स्त्रीमध्ये मासिक पाळीचे चक्र २१ ते ३५ दिवसांपर्यंत असते.

इस्ट्रोजेनकडे अधिक लक्ष देणे गरजेचे

प्रत्येक महिलेच्या शरीरात इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही मासिक पाळीसाठी व स्त्रीत्वाच्या इतर शरीर क्रियांसाठी आवश्यक घटक असतात. यामुळे ती स्त्री बीजांडातून येतात. यातील इस्ट्रोजेन संप्रेरक न्यूरोएंडोक्राइन, कंकाल, ॲडिपोज आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालींवर प्रभाव पाडतात,
यावर रिचमंड रोड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या वरिष्ठ स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. जयश्री नागराज भासगी यांनी म्हटले की, शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीतील बदलांमुळे अनेक स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान त्रास होतो, याचा थेट परिणाम महिलेच्या हृदयावर होत असतो. यामुळे काही वेळा गुंतागुंतीची समस्या निर्माण होऊ शकते.

हाय कोलेस्ट्रॉलचा धोका

इस्ट्रोजेन शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ओळखले जातात. इस्ट्रोजेन हार्मोन लैंगिक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. स्त्रियांमध्ये मासिक पाळीदरम्यान या हार्मोनमध्ये चढ-उतार होतात आणि रजोनिवृत्तीदरम्यान त्यांची पातळी कमी होते. इस्ट्रोजेन हार्मोन्स स्तनांच्या विकासामध्ये आणि स्त्रियांमधील इतर शारीरिक बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. इस्ट्रोजेनच्या गैरहजेरीत शरीरात लिपिड कमी होऊ लागते, विशेषत: रक्तवाहिन्यांमध्ये एथेरोस्क्लेरोसिस नावाची स्थिती निर्माण होते, ज्यामुळे रक्तवाहिनीचे लुमेन अरुंद होते. यामुळे रजोनिवृत्तीमध्ये कोरोनरी आर्टरी स्क्लेरोसिसम आजाराचा धोका सात पटीने वाढतो, असेही डॉ. जयश्री स्पष्ट करतात.

लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब

इस्ट्रोजेनच्या असामान्य पातळीमुळे व्यक्तींमधील रक्तदाब आणि लठ्ठपणावर परिणाम होतो. शरीरातील इस्ट्रोजेनच्या पातळीत घट झाली तर लठ्ठपणा वाढतो. यामुळे हृदय आणि रक्तवहिन्यांसंबंधी रोगांची जोखीमही वाढते, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.

टाइप २ मधुमेहाचा धोका

अनेक अभ्यासांमध्ये, टाइप २ मधुमेह आणि स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी यांच्यातील संबंध आढळून आला आहे. मासिक पाळी अनियमित असलेल्या महिलांमध्ये एन्ड्रोजनची पातळी उच्च असते. यामुळे अशा महिला PCOS किंवा PCOD मुळे ग्रस्त असतात. यावर गुरुग्राममधील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या संचालिका, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ, अरुणा कालरा म्हणाल्या की, PCOS असलेल्या महिलांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. कारण पीसीओएस किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सिंड्रोम हा असा एक सिंड्रोम आहे, ज्यामध्ये मुलीला डिस्लिपिडेमिया होऊ शकतो, हे कोलेस्ट्रॉलची पातळी असामान्य असल्यामुळे होते, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर अशा महिलांना हृदय किंवा कोरोनरी रोग होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे PCOS आणि हृदयविकारासाठी दोन संभाव्य जोखीम घटक – मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसे करावे व्यवस्थापन?

डॉ. जयश्री यांच्या मते, स्त्रीच्या रजोनिवृत्तीपूर्व काळात इस्ट्रोजेन संप्रेरक स्त्रीचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे महिलांनी निरोगी जीवनशैली आणि वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात होणारे आजार टाळण्यासाठी आणि दर्जेदार जीवनाचा आनंद घेण्यासाठी वजन यंत्रणात ठेवण्यासह पुरेशी झोप आवश्यक आहे.