Right vs Left Side Sleeping Benefits: दिवसभराच्या कामानंतर थकलेल्या शरीराला विश्रांती देण्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे पुरेशी झोप घेतली पाहिजे. दररोज पुरेशी झोप घेतल्याने आरोग्य चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहते. तथापि, बहुतेक लोकांना झोपण्याच्या योग्य पद्धतीबद्दल अजूनही अनेक गोष्टी ठाऊक नाहीत. प्राचीन आयुर्वेदीक ग्रंथांमध्ये जेवणानंतर डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला आहे. डाव्या कुशीवर झोपल्याने पोटाचे आरोग्य आणि पचन सुधारते, असे म्हटले जाते. कधी कधी चुकीच्या स्थितीत झोपल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. पण नक्की डाव्या कुशीवर योग्य आहे की उजव्या हे आता आपण जाणून घेऊ
सुदृढ आरोग्यासाठी कसे झोपावे?
निरोगी व्यक्तीसाठी झोप ही चांगली आहार आणि व्यायामाइतकीच महत्त्वाची आहे. पुरेशी झोप न घेतल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही, त्यांना विविध मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तज्ज्ञ आणि अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे की, पाठीवर झोपणे आरोग्यासाठी सर्वांत फायदेशीर आहे. परंतु, एका कुशीवर झोपणेदेखील तितकेच फायदेशीर मानले जाते.
डाव्या कुशीवर झोपणे हे शरीरासाठी चांगले मानले जाते. तुम्हाला तुमच्या झोपण्याच्या स्थितीची आणि दिशेची म्हणजेच तुम्ही कोणत्या बाजूला झोपता याचीही जाणीव असली पाहिजे. हो, हे सर्व घटक तुमच्या आरोग्यावर परिणाम करतात. डाव्या कुशीवर झोपण्याचे हे फायदे आहेत.
- डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयावर दबाव येत नाही.
- जेवणानंतर डाव्या कुशीवर झोपणे पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते.
- छातीत जळजळ आणि आम्लपित्त यांपासून आराम.
- थकवा जाणवत नाही.
- गरोदरपणात डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर असते.
- डाव्या कुशीवर झोपल्याने मणक्यालाही फायदा होतो.
- बद्धकोष्ठतेची तक्रार निघून जाते.
उजव्या कुशीवर झोपण्याचे परिणाम
उजव्या कुशीवर झोपणे अनेकांसाठी हानिकारकदेखील असू शकते. उजव्या कुशीवर झोपल्याने तुमच्या पोटाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि ते पचनसंस्थेसाठी हानिकारक मानले जाते. त्याशिवाय उजव्या कुशीवर झोपल्याने खांदेदुखी आणि मानेच्या समस्या उद्भवू शकतात.