योगगुरू रामदेव बाबा सांगतात, बाजारातून कॉपर सल्फेट आणा आणि तव्यावर भाजून घ्या. भाजल्यावर त्याचा रंग बदलतो आणि तो एक औषध बनतो. या भाजलेल्या कॉपर सल्फेटला तोंड आलेल्या जागेवर लावल्यास फक्त एका दिवसात आराम मिळतो.
तोंड येणे ही एक खूप सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. लहान पांढरे किंवा पिवळसर फोड गालांच्या आत, जीभेवर, ओठांजवळ किंवा हिरड्यांवर होतात. कधी कधी हे इतके दुखतात की बोलणं आणि खाणंही कठीण होतं. वर्षातून एक-दोनदा तरी अनेकांना तोंड येतेच. हे ५–७ दिवस टिकतात, तर काही वेळा १५ दिवसांपर्यंत किंवा महिनाभरदेखील त्रास देतात.
तोंड येण्याचं मुख्य कारण म्हणजे पचन बरोबर न होणं. अपचन, हार्मोनल बदल, व्हिटॅमिन-मिनरलची कमतरता, मसालेदार किंवा गरम पदार्थ जास्त खाणं, ताणतणाव, झोपेची कमतरता; ही सगळी कारणं असू शकतात. योगगुरू रामदेव बाबा यांनी यावर काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत
१. कॉपर सल्फेट
तोंड येण्याच्या त्रासावर सर्वात जुना आणि परिणामकारक घरगुती उपाय म्हणजे कॉपर सल्फेट. हे औषध बाजारातून सहज मिळू शकते. मात्र, त्याचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे. कारण कच्चा कॉपर सल्फेट विषारी असतो, तो थेट वापरू नये. सर्वप्रथम कॉपर सल्फेटचे थोडेसे तुकडे घेऊन तव्यावर किंवा कढईत मंद आचेवर भाजून घ्या. भाजल्यावर त्याचा रंग बदलतो आणि त्याचे विषारी वैशिष्ट्य नष्ट होतात. अशा प्रकारे तयार झालेला कॉपर सल्फेट हा तोंड आलेल्या ठिकाणी लावण्यासाठी उत्तम औषध ठरतो. हा भाजलेला कॉपर सल्फेट तोंड आलेल्या जागेवर हलक्या हाताने लावा. साधारण एक ते दीड तासांत दुखणे कमी होऊ लागते. तोंडामुळे होणारा दाह, वेदना कमी होतात आणि नियमित वापरल्यास केवळ एका दिवसात फोड पूर्णपणे नाहीसा होतो. मात्र, हा उपाय करताना खूप प्रमाणात लावू नये. थोड्या प्रमाणातच वापर केल्यास त्वरित दिलासा मिळतो.
२. तुळशीची पाने
तुळस ही आपल्या घरात सहज मिळणारी औषधी वनस्पती आहे. तिच्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ताज्या तुळशीची पानं दिवसातून २–३ वेळा चघळल्याने तोंडातील जंतु नष्ट होतात, जळजळ कमी होते आणि तोंड आल्याने होणाऱ्या वेदनाही कमी होतात. नियमित तुळशीचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वारंवार तोंड येण्याचा त्रासही टाळता येतो.
३. ज्येष्ठमध वापरा
ज्येष्ठमधामुळे पचन सुधारते आणि शरीरातील साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढले जाते, त्यामुळे तोंड येणे कमी होते.एका ग्लासमध्ये कोमट पाण्यात चिमूटभर ज्येष्ठमध पावडर आणि थोडसे मध घालून रोज सकाळी प्या. यामुळे पोटाची जळजळ शांत होते, ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि पचन सुधारते. नियमित सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तोंड आलेल्या जखमा लवकर भरतात.
४. नारळाच्या तेलाने जातील तोंडातले फोड
नारळ तेलामध्ये अँटीइंफ्लेमेटरी, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल वैशिष्ट्ये असतात, जे त्वचेला सूज, जंतू आणि विषाणूंपासून संरक्षण देतात. दिवसातून दोनदा तोंडावर किंवा ज्या जागेवर तोंड आले आहे, त्या ठिकाणी नारळ तेल हलक्या हाताने लावा. यामुळे दुखणे कमी होते, जळजळ कमी होते आणि आलेले फोड लवकर कमी होतात. तसेच, नारळ तेल त्वचेला मॉइश्चराइज करून कोरडेपणा टाळते आणि फोड झालेल्या भागाची त्वचा लवकर बऱ्या स्थितीत येण्यास मदत करते.