How To Treat Damp Walls Internally: पावसाळ्यानंतर घरांमध्ये ओलसरपणाची समस्या वाढू लागते. घरांमधील किंवा दुकानांमधील ओलसरपणामुळे लोक अनेकदा त्रस्त झालेले दिसतात, यामुळे भिंतीवर पोपडे येतात; शिवाय यामुळे छताचे प्लास्टरही पडते. अनेकदा यावर बुरशी निर्माण झाल्यामुळे ते हिरवे किंवा काळे दिसू लागतात. या समस्यांवर उपाय म्हणून लो वॉटरप्रूफिंग कलर हा चांगला पण महागडा उपाय आहे. परंतु, महाग असल्यामुळे अनेकजण तो करत नाहीत. अशावेळी तुम्हालाही ओलसरपणापासून मुक्ती मिळवायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

भिंतीवरील ओलावा कसा थांबवायचा?

छतावर वॉटरप्रूफिंग सोल्यूशन बनवा

तुमच्या घरात ओलसरपणा येऊ नये म्हणून प्रथम छत स्वच्छ करा. तुटलेले प्लास्टर काढून टाका. नंतर भेगा भरण्यासाठी वॉटरप्रूफिंग कंपाऊंड तयार करा. ते बनवण्यासाठी कोळशाची बारीक पावडर तयार करा. त्यानंतर बादलीमध्ये चुना आणि कोळसा मिक्स करून भिंतींवरील भेंगांमध्ये भरून घ्या.

पाइपलाइन तपासा

कधीकधी घरातील ओलावा पाइपलाइन गळतीमुळे होतो. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी ओलावा आहे, त्या परिसरातील पाइपलाइन चेक करा. गळती दुरुस्त झाल्यानंतर ही समस्या कमी होऊ शकते.

व्हेंटिलेशन चेक करा

ओलसरपणा असलेल्या खोल्यांमध्ये वायुवीजन व्हेंटिलेशन व्यवस्था तपासा. तिथे एक्झॉस्ट फॅन लावा, यामुळे आर्द्रता आणि ओलसरपणा कमी होईल.

भिंतीतील भेगा भरा

जर तुमच्या खोलीत ओलसरपणा दिसून आला तर भेगा भरा. हे करण्यासाठी पट्टी वापरावामुळे ओलसरपणाची समस्या लक्षणीयरीत्या कमी होईल.

गटारे स्वच्छ करून घ्या

कधीकधी घराच्या बाहेरील गटार भरल्याने ओलसरपणा येऊ शकतो, अशावेळी ते स्वच्छ करून घ्या.