What Smell keeps Rats Away: तुमच्या घरातही उंदरांची दहशत निर्माण झाली असेल तर घरात असलेले उंदीर आजारांचा धोका वाढवू शकतात. शिवाय उंदरांमुळे घरातील वस्तूदेखील खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही उंदरांच्या या दहशतीने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या आणि प्रभावी टिप्स संगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही उंदीर न मारता घरातून त्यांना कायमचे पळवून लावू शकता.

उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

कापूर

घरातून उंदीर पळवून लावण्यासाठी तुम्ही कापूर वापरू शकता. कापरचा वास उंदरांना दूर ठेवतो. अशा परिस्थितीत तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवू शकता. यामुळे या ठिकाणी उंदीर येणार नाहीत. याशिवाय तुम्ही कापूर जाळून सकाळी आणि संध्याकाळी घरात फिरवू शकता, यामुळे उंदरांना पळवून लावण्यास मदत होईल. शिवाय डास आणि लहान कीटकदेखील घरापासून दूर राहतील.

दालचिनी

उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दालचिनीची मदत घेऊ शकता. यासाठी दालचिनी पावडर बनवा आणि घरातील ज्या ठिकाणी उंदीर दिसतात त्या ठिकाणी शिंपडा.

तमालपत्र

तमालपत्रांचा वास घरातून उंदीर पळवून लावण्यास मदत करू शकतो. यासाठी १०-१२ तमालपत्रे एकत्र जाळून घरभर फिरवा. तमालपत्रातून निघालेला धूर उंदीर पळवून लावण्यास प्रभावी ठरू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तंबाखू

गव्हाच्या पीठात थोडी तंबाखू मिसळा आणि त्याचे छोटे गोळे बनवा आणि ते घरातील उंदीर येत असलेल्या ठिकाणी ठेवा. तंबाखू खाल्ल्यानंतर उंदीर गोंधळून जातात आणि घरातून पळून जातात.