scorecardresearch

तुमचाही जोडीदार करत आहे तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न? ‘या’ तीन टिप्सच्या मदतीने करा खात्री

वैचारिक मतभेदांच्या स्थितीमध्ये जेव्हा आपला जोडीदार आपल्यावर दबाव आणतो, तेव्हा याचा अर्थ असा असू शकतो की तो आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

काही मुद्द्यांवर आपला जोडीदार आपल्याशी सहमत असतो आणि काही मुद्द्यांवर नाही. (Photo : Pexels)

जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा त्याच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपलीही काही भूमिका असावी असे आपल्याला वाटते. त्याच वेळी, आपल्या निर्णयांमध्ये आपल्या जोडीदाराचाही वाटा असतो. यामुळेच नात्यांमध्ये अनेकदा विचारांची देवाणघेवाण खूप महत्त्वाची असते. काही मुद्द्यांवर आपला जोडीदार आपल्याशी सहमत असतो आणि काही मुद्द्यांवर नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जोडीदाराच्या हिशोबाने आपला निर्णय बदलला पाहिजे.

वैचारिक मतभेदांच्या स्थितीमध्ये जेव्हा आपला जोडीदार आपल्यावर दबाव आणतो, तेव्हा याचा अर्थ असा असू शकतो की तो आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यावरून आपल्याला कळू शकेल की आपला जोडीदार कंट्रोलिंग आहे की नाही.

तुम्हालाही जाणवतेय Double Chin ची समस्या ? मग ‘या’ टिप्स फॉलो करून बघाच

मित्रांना भेटण्यापासून अडवणे :

जर तुमचा पार्टनर तुम्हाला मित्रांना भेटण्यापासून रोखत असेल तर समजून घ्या की तो तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकदा तुमच्या मित्राचा स्वभाव चांगला नसल्याचे कारण देत अनेक जोडीदार आपल्या पार्टनरला त्यांच्या मित्रांना भेटण्यापासून अडवतात. अशा परिस्थितीत प्रथम अडवण्याचे कारण विचारा.

रागासाठी तुम्हाला जबाबदार धरणे :

कोणत्याही नात्यात राग येणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत जर तुमचा पार्टनर तुमच्या या स्वभावासाठी तुम्हाला दोष देत असेल तर याचा अर्थ तो तुमच्यासाठी योग्य जोडीदार नाही. या प्रकरणात, आपण थोडे विचार करणे आवश्यक आहे.

खरबूज खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजार राहतील दूर

तुमच्या वैयक्तिक आवडींवरून तुम्हाला पारखणे :

जर तुमचा जोडीदार तुमच्या वैयक्तिक गोष्टी जसे की कपडे, शूज, नखे, केस, त्वचा इत्यादींवरून तुम्हाला जज करतो, तर समजून घ्या की एकतर त्याला तुमची लाज वाटत आहे किंवा तो तुम्हाला त्याच्यानुसार बनवू इच्छित आहे. अशा स्थितीत, तुमच्या जोडीदाराशी थेट बोला आणि त्याला सांगा की तुम्हाला त्याने असे करणे आवडत नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is your partner trying to control you be sure by following these three tips pvp

ताज्या बातम्या