How to Check Purity of Turmeric Powder: हळद एक असा मसाला आहे; ज्याचा वापर आहारामध्ये तर होतोच, तसेच अनेक आजारांमध्ये उपचार म्हणूनसुद्धा हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असणारे करक्युमिन नावाचे तत्त्व त्याला पिवळा रंग प्रदान करते आणि हेच तत्त्व हळदीची सगळ्यात मोठी ताकदसुद्धा आहे. हळदीचा वापर आयुर्वेदिक उपचारपद्धतीमध्ये अगदी जुन्या काळापासून केला जात आहे आणि आजसुद्धा भारतातील कित्येक घरांमध्ये विविध उपायांसाठी हळदीचा वापर केला जातो. मात्र आजकाल बाजारात भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रिमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हळद शुद्ध की भेसळयुक्त हे कळत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला हे कसं ओळाखायचं हे सांगणार आहोत. हळद शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या टिप्स नक्की करुन पाहा.

हळदीमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत बोलायचे झाले, तर यामध्ये अँटीऑक्सिडंड, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-कार्सिनोजेनिक, अँटी-म्युटाजेनिक व अँटी-इंन्फ्लमेट्री अशा गुणधर्मांचे भांडार आढळते. मात्र भेसळयुक्त हळद आपल्या आरोग्यावर परिणाम करु शकते.

सर्दी झाल्यास हळदीचे दूध किंवा दुखापत झाल्यास हळदीची पेस्ट करा.हळदीचा वापर या किरकोळ समस्यांमध्ये केला जातो. पण आजकाल बहुतांश लोक बाजारात उपलब्ध हळद ​​वापरतात. बाजारात उपलब्ध असलेली हळद मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त असून ती आरोग्यासाठीही हानिकारक आहे. अशा परिस्थितीत, आपण स्वयंपाकघर आणि आरोग्यासाठी वापरत असलेली हळद खरी आहे की बनावट हे कसे समजेल?

बनावट हळद कशी ओळखायची

  • बनावट हळद ओळखण्यासाठी, प्रथम एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात एक चमचा हळद घाला, त्यानंतर ते चांगले मिसळा. मिक्स केल्यावर, जर तुमची हळद शुद्ध असेल तर पाण्यात तळाशी जावून बसेल आणि पाणी पिवळसर रंगाचे होईल. जर तुमची हळद भेसळयुक्त असेल तर पाण्याचा रंग काळसर पिवळा होईल..
  • दुसरी टिप म्हणजे, फक्त एक चिमूटभर हळद पावडर तळहातावर ठेवा आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने १० ते २० सेकंद हातावर चोळा. जर हळद शुद्ध असेल तर हातावर पिवळा रंग राहिल. तुम्ही काही मिनिटांतच घरच्या घरी बनावट आणि खरी हळद ओळखू शकता.

हेही वाचा >> हिवाळ्यात भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका; करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारात मिळणारी हळद शुद्ध आहे की अशुद्ध हे समजणं खूप अवघड असतं. कारण हळदीचा रंग पिवळाच असल्यामुळे त्यातील फरक डोळ्यांना समजत नाही.