तुमच्या मुलासाठी तुमची उत्कृष्ट भेट काय असेल? अनेकजण प्रेम असं म्हणतील. पालक म्हणून तुम्ही कोणत्या भेटीची अपेक्षा करता? कदाचित, आपल्या पाल्याच्या बालपणातील निरागस आठवणी. छायाचित्रकार होली स्प्रिंगने आपल्या पाच वर्षाच्या मुलीच्या छायाचित्रांत कलात्मकतेचा वापर करत अदभूत अशा मायावी सृष्टीची निर्मिती करून तिच्यासाठी ‘वंडरलॅंड’ साकारली.
या छायाचित्रांमध्ये छोटीशी व्हॉयलेट खूप आनंदी असल्याचे दृष्टीस पडते. परंतु, थोड थांबा आणि ही छायाचित्रे निरखून पाहा! प्रथमदर्शी जसे दृष्टीस पडते तितके तिचे आयुष्य सहज नसल्याचे तुम्हाला जाणवेल. होर्शप्रॉंग नावाच्या व्याधीने ग्रस्त असलेल्या व्हॉयलेटची जन्मापासून डाव्या हाताची वाढ योग्यपणे झालेली नाही.
ऑकलंडमधील रुग्णालयात मृत्युशी झुंजत असलेल्या आपल्या मुलीला पाहिल्यानंतर, नाजूक अवस्थेत जगत असलेल्या आपल्या मुलीचे जीवनातील महत्त्व होलीला जाणवले. तिने मुलीचे आयुष्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यास सुरुवात केली. मुलीच्या या छायाचित्रांना विविध बॅकग्राऊंड आणि इफेक्टस् देऊन डिजिटली संपादित करते. छायाचित्रात जिराफाबरोबर खेळताना दिसणारी व्हॉयलेट जिराफाबरोबर खेळत नसून वेगळ्याच ठिकाणी खेळत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून होलीने साकारलेली ही छायाचित्रे केवळ अदभूत अशी असून, प्रत्येक मुलाला अशी मायावी दुनिया अनुभवायला नक्कीच आवडेल. 
(सौजन्य – डेली मेल)
  संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2014 रोजी प्रकाशित  
 अदभूत! आपल्या अपंग मुलीसाठी छायाचित्रांच्या माध्यमातून आईने साकरले ‘वंडरलॅंड’
तुमच्या मुलासाठी तुमची उत्कृष्ट भेट काय असेल? अनेकजण प्रेम असं म्हणतील. पालक म्हणून तुम्ही कोणत्या भेटीची अपेक्षा करता? कदाचित
  First published on:  05-09-2014 at 04:55 IST  
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its magical mom creates wonderland for disabled daughter through photos





