How to Check Adulteration in Wheat Flour: आपल्या रोजच्या जेवणात पोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये दोन वेळेस पोळी किंवा भाकरी खाल्ली जाते. आरोग्यदायी, हलकी आणि पचायला सोपी अशा या पोळीमागचं धक्कादायक सत्य आता समोर आलं आहे. कारण ज्या गव्हाच्या पिठावर आपण पूर्ण विश्वास ठेवतो, तेच पीठ तुमच्या तब्येतीसाठी घातक ठरू शकतं… अगदी विषबाधेपर्यंत..
होय, तुम्ही ऐकताय ते खरंच आहे. घरातलं पीठसुद्धा १००% शुद्ध आहे का, याची खात्री आता करणं गरजेचं आहे, कारण अनेकदा गिरणीत गहू दळताना त्यात इतर धान्यांचे खडे, भेसळयुक्त पदार्थ, अगदी हलक्या दर्जाचा मैदासुद्धा मिसळला जातो आणि ही भेसळ थेट आपल्या पोटात जात असते, रोजच्या पोळ्यांमधून. पण याचं एक सोप्पं, झटपट आणि २० सेकंदात होणारं टेस्टिंग ट्रिक समोर आलं आहे आणि हेच वाचवू शकतं तुमचा जीव.
दिवसातून किमान एकदा तुमच्या घरात पोळी होतेच ना? पण, जर तीच पोळी तुमच्या शरीरात ‘विष’ पसरवत असेल तर? होय, गव्हाच्या पिठात भेसळ झाल्यास अगदी अन्नातून विषबाधा होऊ शकते. तुम्ही घरी पीठ मळताना अवघ्या २० सेकंदांचं एक साधं काम केलं तर हा धोका टाळता येतो. पण हे काम काय आहे? आणि तुमचं पीठ शुद्ध आहे की नाही हे ओळखायचं कस?” पाहा खालील Video आणि वाचा संपूर्ण माहिती, तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही माहिती ‘जीवनावश्यक’ ठरू शकते.
काय कराल?
गॅसवर एक तवा गरम करून त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाका. जर ते पीठ लगेच करपत, भाजत असेल, तर सावध व्हा या पिठात मैद्याची किंवा इतर स्वस्त पिठांची भेसळ असण्याची शक्यता आहे. शुद्ध गव्हाचं पीठ सहजपणे करपत नाही. शिवाय, पीठ चाळून पाहा. वरचा कोंडा जर चाळणीत राहत नसेल तर तिथेही काहीतरी गडबड आहे हे समजून घ्या.
कशामुळे धोका?
भेसळयुक्त पीठ खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता, उलट्या, अपचन, अशक्तपणा आणि काही वेळा अन्नातून विषबाधाही होऊ शकते आणि हो, ही केवळ भाकरी/पोळीवर मर्यादित नाही. पिठातून बनवलेली कोणतीही डिश आरोग्यास धोका ठरू शकते.
पुणेरी तडका या यूट्यूब चॅनेलवर या संदर्भातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर प्रत्येक गृहिणीचा विश्वास डळमळेल.
मग काय कराल?
- गिरणीत पीठ दळताना तिथल्या मालकाला स्पष्ट सूचना द्या
- शक्य असेल तर घरघंटीचा वापर करा.
- पोळी करताना पीठ चाळणे ही सवय आजपासूनच लावून घ्या.
- फक्त २० सेकंदाचं हे काम तुमचं आरोग्य वाचवू शकतं… आणि कधी कधी जीवही.