योगा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण वेळेअभावी बरेच लोक योगा करणे टाळतात. पण तुम्हाला माहित आहे का की, असे अनेक योग आहेत ज्यासाठी वेळ लागत नाही. हे योग तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. असाच एक योग म्हणजे बालायाम योग (नखे एकत्र घासणे). होय, बालायाम योग हा देखील एक योग प्रकार आहे. हा योग केल्याने खूप आश्चर्यकारक फायदे होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार हे दिसून आले आहे की, बालायाम योग खरंच तुमच्या केसांना उत्तम आणि निरोगी राखण्यासाठी काम करतो. कारण तुमच्या नखांच्या खाली ज्या नसा असतात, त्या वास्तविकपणे तुमच्या डोक्याच्या क्षेत्राशी जोडलेल्या असतात. जेव्हा तुम्ही नखे एकमेकांवर घासता तेव्हा रक्ताभिसरणाच्या गतीने त्या नसा प्रोत्साहित होतात ज्यांची लिंक डोक्याशी आहे आणि म्हणून केसांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल्यानेच या योगाभ्यासाचे महत्त्व वाढले आहे.

आणखी वाचा : उभं राहून पाणी पिणं ठरू शकते जीवघेणं! आजच सोडा ही सवय अन्यथा…

  • तणाव दूर होतो

बालायाम योगाने रिफ्लेक्सोलॉजी रिफ्लेक्स क्षेत्रावर दबाव येतो. या दाबाने तुम्ही शरीरातील वेदना आणि तणाव कमी करू शकता. शिवाय, यामुळे मानसिक ताणही कमी होऊ शकतात.

  • केस गळणे कमी होते

नियमितपणे बालायाम योग केल्याने शरीरातील डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी नियंत्रित राहते. यामुळे केसांची चांगली वाढ होते. एवढेच नाही तर नियमितपणे बालायाम योग केल्याने केस पांढरे होणे, टक्कल पडणे आणि निद्रानाश यासारख्या समस्या कमी होऊ शकतात.

  • रक्तसंचार सुधारते

बालायाम योगाने आपल्या शरीरातील अनेक अवयवांना आराम मिळतो. तसेच, हे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत करते. हा योग नियमितपणे केल्याने तुमच्या फुफ्फुसाच्या समस्या आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Just 5 minutes this little time spent on nails can change pdb
First published on: 22-09-2022 at 13:34 IST