Home Remedy for Leg Pain and Swelling: दिवसभराच्या धावपळीनंतर घरी परतल्यावर अनेकदा पायांत असह्य वेदना, सूज आणि जडपणा जाणवतो. पाय जणू सुन्न पडल्यासारखे होतात आणि शरीरात एक विचित्र थकवा पसरतो. अशा वेळी मनात एकच विचार येतो, “काहीतरी असा घरगुती उपाय असावा, जो काही मिनिटांत हा सर्व निमिषार्धात दूर करील!” आणि आश्चर्याची बाब म्हणजे असा उपाय आहेही… तो तुमच्या घरातच! होय, फक्त पाच रुपयांच्या वस्तूमध्ये दडलेलं आहे पायांतील वेदना आणि सूज घालवण्याचं गुपित. ही वस्तू एवढी साधी आहे की, ती तुम्हाला जवळच्या किराणा दुकानात सहजगत्या मिळेल; पण तिचा परिणाम कुठल्याही महागड्या क्रीम किंवा मसाजपेक्षाही अधिक आहे.

दिवसाच्या थकव्यानंतर हा उपाय ठरेल वरदान

आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात की, दिवसभर उभं राहणं, ऑफिसमध्ये लांब वेळ बसून काम करणं किंवा सतत प्रवास करणं यांमुळे पायांच्या स्नायू आणि नसांवर ताण येतो. त्यातून सूज, वेदना व स्नायूंच्या ताणाची समस्या उदभवते. जर तुम्हीही दररोज पाय दुखण्यामुळे त्रस्त असाल, तर फक्त १० मिनिटांत हा घरगुती उपाय तुमचं दुखणं दूर करू शकतो. पद्धत अगदी सोपी आहे… फक्त घ्यायचंय थोडंसं गार किंवा कोमट पाणी आणि ती पाच रुपयांची वस्तू.

उपाय कसा करायचा?

  • एका टबमध्ये कोमट पाणी घ्या.
  • आता त्यात एक छोटा चमचा पांढरा क्रिस्टलसारखा पदार्थ टाका आणि तो नीट ढवळून घ्या.
  • आता या पाण्यात तुमचे पाय १० मिनिटांसाठी बुडवून ठेवा.
  • तुम्ही फक्त इतकंच करा आणि पाहा तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल.

या पाण्यातील घटक पायांचे ताणलेले स्नायू सैल करतात, रक्तप्रवाह सुधारतात व सूज कमी करतात. या उपायाने फक्त काही मिनिटांत पाय हलके, ताजेतवाने आणि आरामदायी वाटतात.

इतके फायदे की, विश्वास बसणार नाही!

तज्ज्ञांच्या मते, या ५ रुपयांच्या उपायाचे अनेक फायदे आहेत :

  • पायांची दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी होते.
  • फंगल इन्फेक्शन कमी होऊ शकतं.
  • फाटलेल्या टाचा मऊ आणि स्वच्छ होतात.
  • पायांची सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात.
  • त्वचेचा रंग उजळतो आणि पायांना नैसर्गिक चमक येते.
  • हे सगळं फक्त १० मिनिटांच्या प्रक्रियेत.

तज्ज्ञांचा सल्ला

हर्बल आणि आयुर्वेदिक उपचारांमध्ये या घटकाला मोठं स्थान आहे. त्यात ॲण्टी-बॅक्टेरियल, ॲण्टी-फंगल व ॲण्टी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे हा घटक त्वचेवरील जीवाणू नष्ट करून पायांना विश्रांती देतो. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरातील थकवा दूर होतो. अनेकांना झोपण्यापूर्वी हा उपाय केल्याने मनही शांत होतं आणि तणाव कमी होतो.

आता ती ५ रुपयांची वस्तू कोणती?

आता प्रश्न असा की, शेवटी ही कमाल करणारी वस्तू आहे तरी कोणती? उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल… ही वस्तू म्हणजे तुरटी! होय, घराघरात सापडणारी ही पांढरी स्फटिकासारखी वस्तू म्हणजेच तुरटी. तिच्या औषधी गुणांमुळे ती दुखणं, सूज, त्वचेचे विकार आणि संसर्गांवर प्रभावी उपाय ठरते. एकंदरीत फक्त पाच रुपयांची या क्षुल्लक वाटणाऱ्या तुरटीचे औषधी गुण लक्षात घेता, ती किती अमूल्य आहे हे लक्षात येतं.

दिवसभराच्या थकव्यानंतर तुरटीचं कोमट पाणी हे तुमच्या पायांसाठी जणू औषध नाही, तर ते तुम्हाला आयुर्वेदिक स्पाचाच अनुभव देते. रासायनिक मलमं आणि गोळ्या वापरण्याआधी एकदा हा सोपा उपाय जरूर करून बघा. कारण- कधी कधी मोठ्या समस्या दूर करण्याचं रहस्य एखाद्या छोट्याशा पाच रुपयांच्या वस्तूमध्ये दडलेलं असतं.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)