Habits To Quit After 30: आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत आपण नकळत काही अशा सवयी अंगीकारतो, ज्या आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करतात. ‘लहानशा चुका, मोठं नुकसान!’, असं म्हणत प्रसिद्ध शिक्षक खानसरांनी तरुण पिढीला खास सल्ला दिला आहे. खानसरांनी उघड केलंय, असं रहस्य, जे ३० वर्षांचं झाल्यावर आयुष्य बदलून टाकतं. सकाळच्या छोट्या सवयींपासून ते रात्रीच्या खाण्यापर्यंत – काय सोडायचं आणि का? याचं उत्तर ऐकून थक्क व्हाल… त्यांनी सांगितलं, “विद्यार्थी जीवनात आवडेल ते खाणं-पिणं चालतं; पण वयाची तिशी गाठताच काही गोष्टी तत्काळ सोडाव्यात; अन्यथा शरीर हळूहळू आजारांचं घर बनतं.”

३० वर्षांचा टप्पा पार करताच शरीर हळूहळू बदलायला लागतं… आणि जर या सवयी सुरूच ठेवल्या तर? प्रसिद्ध शिक्षक खानसरांनी दिलेला सल्ला ऐकून तुम्हीही चकित व्हाल. काही अशा छोट्या सवयी आहेत, ज्या वेळेवर सोडल्या नाहीत, तर पुढचं आयुष्य पश्चात्तापात जाईल…”

खानसरांच्या मते, सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे साखर. ३० वर्षांनंतर पांढऱ्या साखरेचा त्याग करून त्याऐवजी गूळ वापरणं फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर नियमित पिण्यातला चहाही शरीराला घातक ठरतो. त्यामुळे त्याऐवजी ब्लॅक कॉफी हा उत्तम पर्याय आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे रात्रीचं जेवण पूर्णपणे टाळावं.

सकाळची योग्य सुरुवात
खानसरांच्या म्हणण्यानुसार, सकाळी उठताच मोबाईल किंवा टीव्हीकडे पाहण्याऐवजी ५–१० मिनिटे ध्यान, स्ट्रेचिंग किंवा हलका योगाभ्यास करणं शरीर आणि मनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे स्नायू शिथिल होतात, ताण कमी होतो आणि दिवसभर मेंदू तल्लख राहतो.

संपूर्ण नाश्ता आणि पाणी पिणे
पॅक्ड ज्यूस किंवा साधा ब्रेड खाण्यापेक्षा होल ग्रेन ब्रेड, ताजी फळे आणि भरपूर पाणी दिवसाची उत्तम सुरुवात घडवतात. त्यामुळे रक्तातील साखरेचा समतोल राखला जातो आणि शरीराला ऊर्जा मिळते.

काम आणि विश्रांतीत संतुलन
ऑफिस किंवा घरकाम करताना मध्येच छोट्या विश्रांती घेणं गरजेचं आहे. त्या वेळी सुका मेवा, फळं खाणं किंवा साधं स्ट्रेचिंग केल्यानं मन आणि शरीर दोन्ही ताजंतवानं होतं.

दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी छोटे ध्येय
१० मिनिटांचा वॉक, श्वसनाचे व्यायाम किंवा साधं ध्यान ही लहानशी पावलं उचलल्यास तुमच्या जीवनशैलीत मोठा बदल होऊ शकतो.

खानसरांच्या मते, “३० वर्षांनंतर सवयी न बदलल्यास आजार तुमच्यामागे धावायला वेळ लावत नाहीत.” म्हणूनच त्यांनी तरुणांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, आता थोडीशी शिस्त अंगीकारली नाही, तर पुढचं आयुष्य पश्चात्तापात जाईल.

येथे पाहा व्हिडीओ

प्रश्न आता असा आहे – तुम्ही ३० वर्षांचे झाल्यावर या सवयी बदलायला तयार आहात का? की उशीर होईपर्यंत थांबणार?