Kitchen Hacks : स्वयंपाकघरात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गॅस शेगडी, ज्याशिवाय जेवण तयार करणे अवघड आहे. भलेही आज स्वंयपाकघरात इंडक्शन किंवा मायक्रोव्हेवचा वापर होत असला तरीही काही गोष्टींसाठी गॅस शेगडीवरच अवलंबून राहावे लागते. गॅस शेगडी वापरण्याची एक वेगळी पद्धत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने गॅस शेगडी वापरताना काय काळजी घ्यावी याकडे लक्ष दिले पाहिजे. कित्येक लोक गॅस शेगडीचा वापर करत नसल्यास सिलेंडर बंद करतात पण कित्येक लोक फक्त गॅस शेगडीचे बटण बंद करतात.

काही लोक गॅस शेगडी चालू करताना लायटर वापरतात तर काही लोक काडेपेटी वापरतात. गॅस शेगडी चालू किंवा बंद करण्याच्या बाबतील काही गोष्टींचा संबंध थेट सुरक्षिततेशी असतो. गॅस चालू करताना कदाचित तुमच्याकडून अनवधानाने काही चुका होऊ शकतात, ज्या नंतर धोकादायक ठरू शकतात. चला जाणून घेऊ या गॅस शेगडी चालू करण्याची योग्य पद्धत आणि सुरक्षिततेसाठी काही टिप्स.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
how to shave underarm hair know the 5 easy steps to shave armpit
काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करताय? मग ‘या’ चार गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा…
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

गॅस शेगडी पेटवताना या गोष्टींची घ्या काळजी

  • जर तुम्ही काडीपेटीने गॅस शेगडी पेटवत असाल तर आधी काडी पेटवा मग गॅस शेगडीचे बटण चालू करा म्हणजे पटकन गॅस शेगडी पेटवता येईल. लोक नेहमी काडीपेटीने पेटविण्याआधीच गॅस शेगडीचे बटण चालू करतात. यामध्ये गॅस वाया तर जातोच, पण हवेत जास्त गॅस पसरतो आणि काडी पेटवल्यानंतर मोठी आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हात भाजण्याचादेखील धोका निर्माण होतो.

    हेही वाचा – पाण्याची बाटली खराब झाल्यास कशी करावी साफ? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
  • गॅस पेटवताना त्याचे सेटिंग कमी ठेवावे म्हणजेच नॉबने गॅसचा फ्लो कामी ठेवून लायटर किंवा काडी पेटवावी. त्यानंतर तुम्ही स्वत:च्या सोयीनुसार गॅस शेगडीची आच कमी-जास्त करू शकता.पण गॅस शेगडी चालू करताना आच मोठी ठेवल्यास जास्त गॅस बाहेर पडतो आणि मोठी ज्योत पेटू शकते.

    हेही वाचा Kitchen Tips: स्वयंपाकघरातील चाकू-सुऱ्या साफ कशा कराव्या? जाणून घ्या योग्य पद्धत
  • काडीपेटीने गॅस पेटत नसेल तर गॅस बंद करा आणि पेटवलेली काडी विझवा. गॅस शेगडीमधून येणारा गॅस हवेमध्ये मिसळतो. अशात गॅस बंद ठेवला तरी काडीपेडीची काडी पेटवल्यानंतर हवेत पसरलेला गॅस धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे काही वेळ थांबावे आणि मग पुन्हा प्रयत्न करावा.
  • काडीपेटीऐवजी लायटरने गॅस पेटवण्याचा सल्ला दिला जातो, कारण काडीपेटी वापरताना थोडासा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.