How to keep vegetables fresh in Marathi: रोज भाजी मार्केटमध्ये जाऊन फ्रेश भाजी आणणं बऱ्याच जणींना जमत नाही. किंवा आपल्या वेळेला भाजीवाला येईलच असंही नाही. त्यामुळे सहसा 4 ते 5 दिवस पुरेल एवढी भाजी आपण एकदम घेऊन ठेवतो. पण ही भाजी काहीवेळेस फ्रिजमध्ये ठेवताना नीट काळजी न घेतल्यामुळे भाज्या खराब होतात तर काही जणांकडे फ्रिज नसल्यामुळे या भाज्या खराब होतात. अशावेळी भाज्या खराब होऊ नयेत, त्या अधिक काळ फ्रेश आणि टवटवीत रहाव्यात यासाठी या काही पद्धती करून बघा..

भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारे साठवावा लागतो. काही भाज्या खोलीच्या तपमानावर ताज्या ठेवता येतात तर काही फ्रिजमध्ये ठेवून ताज्या राहतात. अशा परिस्थितीत कोणती भाजी कशी साठवून दीर्घकाळ ताजी ठेवता येईल ते जाणून घेऊया.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

पालेभाज्या अशा प्रकारे साठवा

पालक आणि कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या साठवण्यासाठी या भाज्या थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. या भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी नीट धुवून कोरड्या कराव्यात. यानंतर या भाज्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि सीलबंद पॅकमध्ये ठेवा. अशा प्रकारे पॅक केल्यानंतर, आपण भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. यामुळे भाज्या जास्त काळ ताज्या राहतील. तसेच टोपलीमध्ये भाज्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवू नका.

बटाटे, कांदे आणि यासारख्या इतर भाज्या साठवा

बटाटे आणि कांदे यांसारख्या भाज्या १ ते २ आठवडे सहज साठवता येतात. बटाटे आणि कांदे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. लसूण, बटाटे आणि कांदे यांसारख्या भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी त्यांना थंड ठिकाणी ठेवा. लसणाची हवा नीट होण्यासाठी ज्यूटच्या पिशवीत टांगून ठेवा. यामुळे लसूण बराच काळ ताजे राहते. पण कांद्यासोबत बटाटे कधीही ठेवू नका.

हेही वाचा >> Women’s Day 2024: आरोग्याची हेळसांड थांबवा! आनंदानं जगणार कधी? जाणून घ्या कशी घ्याल स्वत:ची काळजी

काकडी आणि टोमॅटो पाण्यात टाका आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अशा प्रकारे साठवून ठेवल्यास या भाज्या दीर्घकाळ ताज्या राहतील. गाजर धुऊन वाळल्यानंतरच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. काकडी, सिमला मिरची, वांगी, यांसारख्या भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी ओल्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात.

भाज्या ठेवण्याचे पाऊच

आजकाल बाजाराच भाज्या ठेवण्यासाठी खास पाऊच मिळते. या पाऊचला वरून एक झिप असते. ही झीप लावली की ते पाऊच एकदम एअर टाईट होते. त्यामुळे मग त्यात भाज्या अधिक काळासाठी चांगल्या टिकून राहतात.